श्लोक प्रदर्शन लवकरच गोव्यात
By Admin | Updated: November 16, 2014 01:32 IST2014-11-16T01:32:20+5:302014-11-16T01:32:20+5:30
कला महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि व्यावसायिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारे ‘श्लोक प्रदर्शन’ लवकरच गोव्यातही आयोजित करण्यात येणार आहे.

श्लोक प्रदर्शन लवकरच गोव्यात
औरंगाबाद : कला महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि व्यावसायिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारे ‘श्लोक प्रदर्शन’ लवकरच गोव्यातही आयोजित करण्यात येणार आहे. पेंटिंग, मूर्ती व चित्रे अशा गटांत हे प्रदर्शन होईल. प्रवेश प्रकिया सुरू झाली असून, 15 डिसेंबर्पयत अर्ज करता येणार आहेत.
गोवा, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांतील कलाकार यात सहभागी होऊ शकतील. व्यावसायिक आणि विद्यार्थी अशा दोन्ही गटांत कलाकारांना पुरस्कार व प्रावीण्य प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. विद्यार्थी कलाकाराने आपल्या पेंटिंगच्या छायाचित्रमागे महाविद्यालयाच्या ओळखपत्रची अॅटेस्टेड ङोरॉक्स लावावी. व्यावसायिक व इतर कलाकार पदवीधर असावेत, तसेच कलाकाराची 3-4 सोलो किंवा ग्रुप एक्ङिाबिशन्स झालेली असावीत.
प्रवेशाच्या वेळी कलाकाराने आपला बायोडाटा सोबत द्यावा. प्रवेशासाठी 8 बाय 1क् इंचेस आकाराच्या पेंटिगचे छायाचित्र सादर करावे. त्याची सीडी 3क्क् डी.पी.आय. फॉरमॅटमध्ये जमा करावी. जमा केलेली छायाचित्रे परत केली जाणार नाहीत. एक कलाकार जास्तीत जास्त चार पेंटिग्ज पाठवू शकेल.
विद्यार्थी कलाकारांना प्रति पेंटिंग 15क् रुपये भरावे लागतील. व्यावसायिक व इतर कलाकारांना प्रति पेंटिंग 3क्क् रुपये आकारण्यात येतील. फी परत केली जाणार नाही. सर्व पेंटिंगच्या मागे कलाकाराचे नाव, जन्मतारीख, पत्ता, पेंटिंगचे शीर्षक, माध्यम, आकार, मूल्य इत्यादी तपशील असावा.
कॅन्व्हासचा आकार 1क् स्क्वेअर फूट असावा. त्यापेक्षा मोठी फ्रेम स्वीकारली जाणार नाही. फ्रेमची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कलाकारांचीच राहील. माउंट बोर्डवरील पेंटिंग स्वीकारली जाणार नाहीत. प्रदर्शनासाठी निवड झालेली वॉटर कलर व चारकोलने रेखाटलेली चित्रे अॅक्रॅलिक काचेच्या फ्रेममध्ये असावीत. प्रदर्शनात पेंटिंग व इतर कलाकृतींची विक्री होऊ शकेल. यासंदर्भात अंतिम निर्णय आयोजन पथकाकडे राहील, अशा विविध सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कलावंतांना व्यासपीठ मिळणार आहे. (प्रतिनिधी)