शिवस्मारकाचे भूमिपूजन लांबले!
By Admin | Updated: February 3, 2015 01:36 IST2015-02-03T01:36:57+5:302015-02-03T01:36:57+5:30
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजनाचा मुहूर्त पूर्वघोषित १९ फेब्रुवारीवरून महाराष्ट्र दिनापर्यंत लांबणीवर पडला आहे.

शिवस्मारकाचे भूमिपूजन लांबले!
मुंबई : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजनाचा मुहूर्त पूर्वघोषित १९ फेब्रुवारीवरून महाराष्ट्र दिनापर्यंत लांबणीवर पडला आहे. त्यापूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सर्व संबंधित परवानगी द्यावी, असा राज्य सरकारचा आग्रह असल्याचे कळते.
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सोमवारी बैठक झाली. यावेळी शिवस्मारकाला लागणारी पर्यावरणाची मंजुरी लवकर देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. आपल्यास महाराष्ट्र दिनी शिवस्मारकाचा भूमीपूजन समारंभ करायचा असून त्यापूर्वी सर्व प्रक्रिया पार पाडायच्या आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्यावर जावडेकर यांनी राज्य सरकारने काही बाबींची पूर्तता करणे बाकी आहे. तेवढे केल्यास लागलीच पर्यावरणाची मंजुरी दिली जाईल, असे स्पष्ट केले. हे भूमीपूजन १९ फेब्रुवारीला करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी याआधी जाहीर केले होते. (विशेष प्रतिनिधी)