शिवसेनेचा ‘आवाज’ पुणो जिल्ह्यातून
By Admin | Updated: November 22, 2014 23:19 IST2014-11-22T23:19:41+5:302014-11-22T23:19:41+5:30
शिवसेनेने केलेल्या प्रवक्त्यांच्या नियुक्तीमध्ये पुणो जिल्ह्यातील तब्बल तीन नेत्यांना संधी मिळाली असून शिवसेनेचा आवाज आता पुणो जिल्ह्यातूनच घुमणार आहे.
शिवसेनेचा ‘आवाज’ पुणो जिल्ह्यातून
पुणो : शिवसेनेने केलेल्या प्रवक्त्यांच्या नियुक्तीमध्ये पुणो जिल्ह्यातील तब्बल तीन नेत्यांना संधी मिळाली असून शिवसेनेचा आवाज आता पुणो जिल्ह्यातूनच घुमणार आहे.
डॉ. निलम गो:हे, आमदार विजय शिवतारे आणि डॉ. अमोल कोल्हे यांची शिवसेनेने प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. डॉ. कोल्हे वगळता यातील दोघे आमदार आहेत. गो:हे पूर्वीही होत्या. प्रसिध्द अभिेनेते डॉ. कोल्हे यांच्यावर पुणो जिल्ह्याच्या संपर्कनेत्याबरोबरच प्रवक्तेपदाचीही जबाबदारी आहे. तर विजय शिवतारे हे त्यांच्या सडेतोड भूमिकेसाठी प्रसिध्द आहे.
डॉ. गो:हे यांनी आजर्पयत सातत्याने प्रसिध्दीमाध्यमातून शिवसेनेची भूमिका अत्यंत संतुलितपणो मांडली आहे. पक्षाच्या वतीने वृत्तवाहिन्यांवरील चर्चेचे प्रतिनिधीत्वही त्या करतात. अतिशय शांतपणो, मात्र तितक्याच ठामपणो भूमिका मांडण्याबाबत त्या प्रसिध्द आहे. विजय शिवतारे हे गेल्या काही वषांपासून सातत्याने माध्यमांतील चर्चेमध्ये सहभागी होत असतात. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांपैकी ते मानले जात आहेत. प्रामुख्याने कडवा शरद पवार विरोध हे देखील त्यांचे वैशिटय़ मांडले जाते. पुरंदर मतदारसंघातून आपली जागा राखण्यात यश मिळविलेले ते पुणो जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. डॉ. कोल्हे यांनी जुन्नर मतादारसंघातून मिळत असलेली उमेदवारी नाकारली होती. राज्यभर शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून लढत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने या तीन ‘तोफां’चा पुणो जिल्ह्याला लाभ होईल, असे मानले जाते. पुण्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावताना त्यांना आणखी ताकद मिळणार आहे.