गाजरं खाणारे शिवसेनेचे वाघ !
By Admin | Updated: December 1, 2014 02:46 IST2014-12-01T02:45:24+5:302014-12-01T02:46:36+5:30
साहेब, गृह खातं मला द्या; अजित पवारांना मातोश्रीवर यायला भाग नाही पाडलं तर नाव बदलीन. विधान परिषदेतील एक आक्रमक शिवसेना नेता सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर बढाया मारीत आहे.

गाजरं खाणारे शिवसेनेचे वाघ !
मुंबई : साहेब, गृह खातं मला द्या; अजित पवारांना मातोश्रीवर यायला भाग नाही पाडलं तर नाव बदलीन. विधान परिषदेतील एक आक्रमक शिवसेना नेता सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर बढाया मारीत आहे. महिला व बालकल्याण हे काय केवळ महिलांकरिता तयार केलेलं खातं आहे! एखादे चांगले खाते मिळाले तर बघा कशी कमाल करून दाखवते ते... शिवसेनेतील एक बोलक्या महिला नेत्या चांगल्या खात्याकरिता खुंटी बळकट करण्यात दंग आहेत... मंत्रिपदे आणि खाती याची गाजरे खाणारे शिवसेनेचे वाघ पाहून उद्धव ठाकरे हे कॅमेरा खांद्याला लावून खºयाखुºया व्याघ्रदर्शनाकरिता अजून घराबाहेर कसे पडले नाहीत, असा सवाल निकटवर्तीय करीत आहेत. शिवसेनेत मंत्रिपदाकरिता उत्सुक असलेल्या अनेकांनी उद्धव यांच्या अपरोक्ष खातेवाटप करून टाकले आहे. उद्धव यांच्यासमोर बसताना बहुतांश इच्छुक खात्याचा उल्लेख करून आपण या खात्यात कशी चमक दाखवू, आपल्याकडे कशा योजना आहेत याचा पाढा सुरू करतात, असे समजते. विधान परिषदेवरील एका नेत्याला सहकार खाते हवे आहे. हे खाते मिळाले तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे कंबरडे मोडू, असा या नेत्याचा दावा आहे. मागील युती सरकारमध्ये तुमच्याकडे आठ महिन्यांकरिता हे खाते होते ना, त्या वेळी तुम्ही काय वेगळे करून दाखवले होते, असा सवाल केल्यावर हे गप्प बसतात. सध्या विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याकरिता दाढीवरून हात फिरवणाºया तडफदार नेत्याला सार्वजनिक बांधकाम खात्याची आशा लागलेली आहे. डॉक्टरकी नावापुढे लागलेल्या एका विधान परिषद सदस्याला आरोग्य नव्हे, तर जलसंपदा खात्याची आस लागलेली आहे. डॉक्टर झालो म्हणजे काय राज्याच्या आरोग्याचीच काळजी वाहायची का, असा त्यांचा रोकडा सवाल आहे. विधानसभेतील काही आमदारही उद्धव यांची भेट घेऊन विधान परिषदेच्या अमुक एकाला अमुक एका खात्याचे आश्वासन दिले आहे का, असा सवाल करीत सुटले तर आपल्याला ते खाते हवे आहे, असे सुचवत आहेत. शिवसेनेतील आपले हे वाघासारखे आमदार गाजरे खाताना पाहून उद्धव अचंबित झाल्याचं निकटवर्तीयांमध्ये बोलले जात आहे. (विशेष प्रतिनिधी)
> शिवसेनेत मंत्रिपदाकरिता उत्सुक असलेल्या अनेकांनी उद्धव यांच्या अपरोक्ष खातेवाटप करून टाकले आहे. उद्धव यांच्यासमोर बसताना बहुतांश इच्छुक खात्याचा उल्लेख करून आपण या खात्यात कशी चमक दाखवू, आपल्याकडे कशा योजना आहेत याचा पाढा सुरू करतात, असे समजते. विधान परिषदेवरील एका नेत्याला सहकार खाते हवे आहे. हे खाते मिळाले तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे कंबरडे मोडू, असा या नेत्याचा दावा आहे.