शिवसेनेमध्ये वरळीतही 'बंडा'चे वारे?

By Admin | Updated: February 4, 2017 10:51 IST2017-02-04T10:51:33+5:302017-02-04T10:51:33+5:30

वरळी कोळीवाड्यात शिवसेनेने हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या नवनाथ करंदीकरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Shivsena's 'rebellion'? | शिवसेनेमध्ये वरळीतही 'बंडा'चे वारे?

शिवसेनेमध्ये वरळीतही 'बंडा'चे वारे?

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - मुंबई महापालिका निवडणुकीचा संग्राम अवघ्या १७ दिवसांवर आला असून आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र असे असतानाही तिकीटावरून राजकीय पक्षांमध्ये राडेबाजी सुरूच असून शिवेसेनेमध्ये वरळीतही बंडाचे वारे वाहू लागले आहेत. वरळी कोळीवाड्यात हेमांगी वरळीकरांविरोधात बंडखोरी झाली असून नवनाथ करंदीकरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक नाराज झाले असून त्यांनी निषेधही नोंदवला आहे. 

 

Web Title: Shivsena's 'rebellion'?