भाजपाला केवळ 120 जागा देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव
By Admin | Updated: September 17, 2014 02:16 IST2014-09-17T02:16:39+5:302014-09-17T02:16:39+5:30
भाजपाची 135 जागांची मागणी सपशेल फेटाळणा:या शिवसेनेने भाजपाला 12क् जागा देऊ केल्या असून स्वत: शिवसेना 15क् जागा लढवणार आहे,

भाजपाला केवळ 120 जागा देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव
शिवसेना 150 तर मित्रपक्ष 18 जागा लढणार
संदीप प्रधान - मुंबई
भाजपाची 135 जागांची मागणी सपशेल फेटाळणा:या शिवसेनेने भाजपाला 12क् जागा देऊ केल्या असून स्वत: शिवसेना 15क् जागा लढवणार आहे, तर मित्रपक्षांना 18 जागा सोडणार आहे. शिवसेनेच्या याच प्रस्तावावर मंगळवारी दिल्लीत चर्चा झाली असून बुधवारी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी शिवसेनेने भाजपाला 135 जागा देऊ करताना मित्रपक्षांना द्यायच्या 18 जागा त्यामधून देण्याचा प्रस्ताव देऊ केला होता. त्या प्रस्तावानुसार शिवसेना 153 जागा लढवणार होती. मात्र मित्रपक्षांना 18 जागा दिल्यावर एकटय़ा भाजपाला लढण्याकरिता 117 जागा मिळत होत्या. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपा 119 जागा लढली होती. त्यामुळे त्या फॉम्यरुलात भाजपाला दोन जागांचा घाटा होत होता. आता सेनेने 15क् जागा लढवताना भाजपाला 12क् जागा देऊ केल्या असून मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यात येणार आहेत. या फॉम्यरुलानुसार भाजपाला एक जागा वाढवून मिळेल.
भाजपाने जागा वाढवून मागताना सुमारे 2क् वर्षापूर्वी लोकसभेच्या 32 जागा भाजपा लढत होती तर शिवसेना 16 जागा लढवत होती, याचा दाखला दिला आहे. आतार्पयत भाजपाने शिवसेनेला लोकसभेच्या सहा जागा वाढवून दिल्याने जागावाटपाचे सूत्र 26-22 झाले आहे, असे भाजपाचे मत आहे. त्यावर शिवसेनेकडून सांगितले जात आहे की, एकेकाळी भाजपा विधानसभेच्या 1क्5 जागा लढवत होती. आता 15 ने जागा वाढून 12क् करण्याची सेनेची तयारी आहे.