शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ShivSena Symbol: शिवसेनेचे 'धनुष्यबाण' चिन्ह आम्हाला मिळावे; शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 21:35 IST

ShivSena Symbol: 'धनुष्यबाण' चिन्ह मिळवण्यसाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई: शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) गट आपणच खरी शिवसेना असल्याचे सिद्ध करण्याच प्रयत्न करत आहेत. यातच पक्षाचे 'धनुष्यबाण' हे चिन्ह मिळवण्यसाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. धनुष्यबाण कुणाचा यावर उद्या म्हणजे शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. यातच आता चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची माहिती आहे.

ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून 'धनुष्यबाण' चिन्हाचा गैरवापर होतोय, अशी तक्रार करणारे पत्र शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला(Election Commission of India) लिहिले आहे. धनुष्यबाण आम्हालाच देण्यात यावे अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे, येत्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीच चिन्ह मिळावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जातोय. आता शिंदे गटाच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे हे पाहावे लागेल. 

निवडणूक आयोगाची भेट घेणार-राहुल शेवाळेदरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी 'धनुष्यबाण' चिन्हावर दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे गट शुक्रवारी निवडणूक आयोगाला भेटणार आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे यांनी पीटीआयला सांगितले की, "पक्षाच्या निवडणूक चिन्हासंदर्भात आम्ही शुक्रवारी निवडणूक आयोगाची भेट घेत आहोत."

उद्या निकाल लागण्याची शक्यता उद्या म्हणजेच शुक्रवारी या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपली बाजू मांडायला सांगितली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून चिन्ह मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना