ShivSena Symbol: शिवसेनेचे 'धनुष्यबाण' चिन्ह आम्हाला मिळावे; शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 09:34 PM2022-10-06T21:34:59+5:302022-10-06T21:35:33+5:30

ShivSena Symbol: 'धनुष्यबाण' चिन्ह मिळवण्यसाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Shivsena Symbol | Eknath Shinde and Uddhav Thackeray claims for party's 'bow and arrow' poll symbol | ShivSena Symbol: शिवसेनेचे 'धनुष्यबाण' चिन्ह आम्हाला मिळावे; शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

ShivSena Symbol: शिवसेनेचे 'धनुष्यबाण' चिन्ह आम्हाला मिळावे; शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

googlenewsNext

मुंबई: शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) गट आपणच खरी शिवसेना असल्याचे सिद्ध करण्याच प्रयत्न करत आहेत. यातच पक्षाचे 'धनुष्यबाण' हे चिन्ह मिळवण्यसाठी दोन्ही गटाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. धनुष्यबाण कुणाचा यावर उद्या म्हणजे शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. यातच आता चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याची माहिती आहे.

ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून 'धनुष्यबाण' चिन्हाचा गैरवापर होतोय, अशी तक्रार करणारे पत्र शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला(Election Commission of India) लिहिले आहे. धनुष्यबाण आम्हालाच देण्यात यावे अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे, येत्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीच चिन्ह मिळावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जातोय. आता शिंदे गटाच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे हे पाहावे लागेल. 

निवडणूक आयोगाची भेट घेणार-राहुल शेवाळे
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी 'धनुष्यबाण' चिन्हावर दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे गट शुक्रवारी निवडणूक आयोगाला भेटणार आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे यांनी पीटीआयला सांगितले की, "पक्षाच्या निवडणूक चिन्हासंदर्भात आम्ही शुक्रवारी निवडणूक आयोगाची भेट घेत आहोत."

उद्या निकाल लागण्याची शक्यता 
उद्या म्हणजेच शुक्रवारी या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपली बाजू मांडायला सांगितली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून चिन्ह मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. 

Web Title: Shivsena Symbol | Eknath Shinde and Uddhav Thackeray claims for party's 'bow and arrow' poll symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.