शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sunil Raut : कुठल्याही वकिलाला विचारा, संजय राऊतांनी 1 रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही - सुनिल राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 10:44 IST

Shivsena Sunil Raut : संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटांचा शिवसेनेवर ताबा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात निवडणूक आयोगाने गटांचे नाव व चिन्हांबाबत निर्णय दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे राहील. ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल करण्यात आले. तर शिंदे गटाला चिन्हाचे नवे तीन पर्याय मागितले आहेत. याच दरम्यान संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत (Shivsena Sunil Raut) यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"एकनाथ शिंदंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा शिवसेना संपवण्याचं काम करतंय" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. त्यांची काहीच चूक नाही. देशातल्या कुठल्याही वकिलाला विचारा. माझ्याकडून चार्जशीट घेऊन जा… यांच्यावर एफआयआर होऊ शकतो, असं कुणीही म्हणणार नाही. पण जोपर्यंत भाजपाचं राज्य आहे, हे होऊ शकत नाही…" असं म्हटलं आहे. विक्रोळीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

"शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना संपवण्याचं काम"

भारतीय जनता पार्टीला काहीही झालं तरी सत्ता पाहिजे. ज्यांचे 120 आमदार निवडून आले, त्यांचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री का झाले?, असा सवाल त्यांनी केला. तसेच बिनपक्षाचा मुख्यमंत्री…. एकनाथ शिंदे… या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस काम करणार का? तर तसं नसून एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेना संपवण्याचं काम भाजपा करतंय, असा आरोप सुनिल राऊत यांनी केला आहे.

"50 खोके तर मला किती ऑफर असेल?"

"उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचा बंगला सोडावा लागला तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या डोळ्यात अश्रू होते. संजय राऊतांना जेव्हा पोलीस घेऊन जात होते, तेव्हा माझ्या 84 वर्ष वय असलेल्या आईच्या डोळ्यात अश्रू होते… हे महाराष्ट्र विसरणार नाही. मलासुद्धा ऑफर होती. मी तर संजय राऊत यांचा भाऊ.. त्यांना 50 खोके तर मला किती ऑफर असेल? पण मी खोक्यांपुढे झुकलो नाही" असं सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाSunil Rautसुनील राऊत