शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'इतका अभ्यास बरा नाही, अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे'; संजय राऊतांचा राज्यपालांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 11:43 IST

'पक्षाला देणगी देण्यात कोणाची हरकत नाही, पण देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पक्षासाठी देणगी मागणे योग्य नाही.'

मुंबई: शिवसनेचे खासदार संजय राऊत (Snjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना चिमटा काढला आहे. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवर अभ्यास करून निर्णय देतो, असे आश्वासन भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले होते. याच आश्वासनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. 

संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, 'महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे फारच अभ्यासू व्यक्ती आहेत. इतका अभ्यास बरा नाही. घटनेत स्पष्ट लिहिले आहे की, मंत्रिमंडळाच्या शिफारशी तुम्हाला मान्य कराव्या लागतात. त्यामुळे आमच्या 12 आमदारांची नियुक्ती बंधनकारक आहे. त्यामुळे इतका अभ्यास बरा नाही,' असे म्हणत राऊतांनी कोश्यारींना चिमटा काढला.

शांतता अभ्यास सुरू आहे...राऊत पुढे म्हणाले की, 12 आमदारांच्या शिफारशीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण राज्यपालांचा अभ्यास सुरू आहे. शांतता अभ्यास सुरू आहे असे नवीन नाट्य राजभवनात सध्या सुरू आहे. केवळ राज्यपालच नाहीत तर भाजपचे नेतेही त्या नाट्यात भाग घेत आहेत. आता काही दिवस नाटक चालेल, नाटक रंगू द्या. 50 टक्के क्षमतेची आसन व्यवस्था असल्याने अशा प्रकारची नाटके होतं असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपच्या निधीवर टीकायावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भाजपसाठी निधी मागण्यावरही टीका केली. 'भारत शेतकऱ्यांमुळे, कष्टकऱ्यांमुळे आणि उद्योजकांमुळे बलाढ्य झाला. मात्र आम्हाला आताच नव्याने समजले की, भाजपला देणग्या दिल्याने देश बलाढ्य होतो. देणग्या आम्हालाच द्या दुसऱ्याला देऊ नका असा स्पष्ट संदेश आहे. देशातील लोकांकडून देणग्या घेणे हा बहाणा आहे. हा देशातील उद्योगपतींना स्पष्ट संदेश आहे की देणग्या आम्हालाच द्या. दुसऱ्याला दिल्या तर आमचे त्यावर लक्ष राहील. पक्षाला देणगी देण्यात कोणाची हरकत नाही. मात्र देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पक्षासाठी निधी मागणे योग्य नाही, हे पंतप्रधानांचे काम नाही,' असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी