शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंची सरकारी अधिका-यांना आई बहिणीवरून शिवीगाळ
By Admin | Updated: October 29, 2015 16:26 IST2015-10-29T16:26:38+5:302015-10-29T16:26:38+5:30
हिंदूंची मंदीरं तोडायची, आणि मशिदींवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही कारवाई करायची नाहीत असा आरोप करत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारी अधिका-यांना अक्षरश: आई बहिणीवरून शिवीगाळ केली

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंची सरकारी अधिका-यांना आई बहिणीवरून शिवीगाळ
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २९ - हिंदूंची मंदीरं तोडायची, आणि मशिदींवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असूनही कारवाई करायची नाहीत असा आरोप करत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारी अधिका-यांना अक्षरश: आई बहिणीवरून शिवीगाळ केली आणि जाहीर सभेतही आयुक्त तहसीलदारांसह सरकारी अधिका-यांवर चिखलफेक केली आहे.
औरंगाबादमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येत असून यामध्ये केवळ हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कारवाई होत असल्याचा खैरे यांचा आरोप आहे. तर, न्यायालयाने केवळ हिंदूंच्या नाही तर सगळ्या धर्मीयांच्या अनधिकृत स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची वस्तुस्थिती आहे.
तहसीलदारांना धमकावल्याप्रकरणी तसेच त्यांच्यावर शारिरिक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खैरे यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
वरीष्ठ पोलीसांची याप्रकरणी बैठक सुरू असून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, धमकावणे आधी गुन्हे त्यांच्यावर दाखल होऊ शकतात.
मात्र, हिंदू धर्म खतरे मे है, असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी काय होईल त्याला आपण त्याला आहोत अशी आव्हानात्मक भाषा केली आहे. या संदर्भातले व्हिडीयो उपलब्ध असून त्यामध्ये खैरे यांची दमदाटी स्पष्ट दिसत आहे.