शिवसेना, मनसे, भाजपाचे 'Selfish' पॉईंट

By Admin | Updated: March 4, 2017 01:48 IST2017-03-03T13:09:37+5:302017-03-04T01:48:32+5:30

शिवाजी पार्क मैदानातील सेल्फी पॉईंटवरुन रंगलेल्या राजकारणात अखेर मुंबई महापालिकेने सर्वमान्य तोडगा काढला आहे.

Shivsena, MNS, BJP's 'Selfish' point | शिवसेना, मनसे, भाजपाचे 'Selfish' पॉईंट

शिवसेना, मनसे, भाजपाचे 'Selfish' पॉईंट

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 3 - दादर, शिवाजी पार्कवरील ‘सेल्फी पॉइंट’वरून सुरू असलेले राजकारण मिटवण्यासाठी महापालिकेनेच आज पुढाकार घेतला. मनसे, शिवसेना आणि भाजपाला ‘सेल्फी पॉइंट’साठी स्वतंत्र जागा देऊन, या वादाचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. यामुळे ‘सेल्फिश’ राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांचाही नाईलाज होऊन या वादावर पडदा पडला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी ‘स्टडी पॉइंट’ची मागणी केल्याने या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. 

महिलांसाठी आरक्षित दादर, शिवाजी पार्क प्रभागात आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणाऱ्या संदीप देशपांडे यांना हा पराभव जिव्हारी लागला. यामुळे त्यांनी शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉइंट बंद करण्याची घोषणा केली. मात्र, यावरून चांगलेच राजकारण तापले. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपण ‘सेल्फी पॉइंट’ आणखी आकर्षक करणार असल्याचे ‘टिष्ट्वट’ करून जाहीर केले, तर शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी नवीन कलाकृतींसह ‘सेल्फी पॉइंट’ सुशोभित करणार असल्याचे जागोजागी फलक लावले. 
यामुळे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन, ‘सेल्फी पॉइंट’ पुन्हा सुरू करण्याचे आदेश देशपांडे यांना दिले. तोपर्यंत भाजपाने आयुक्तांमार्फत ‘सेल्फी पॉइंट’ बनविण्याची परवानगी मिळवली. या ‘सेल्फिश’ घडामोडींची दखल घेऊन जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी दादरमधील ‘सेल्फी पॉइंट’च्या वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी मनसे, शिवसेना आणि भाजपा या पक्षांची बैठक बोलावली. 
या बैठकीत तिन्ही पक्षांना ‘सेल्फी पॉइंट’साठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शिवाजी पार्क परिसराला, यापुढे ‘सेल्फी पॉइंट’चा वेढा पडल्याचे पाहायला मिळणार आहे. प्रत्येक पक्षाने ५० फुटांच्या अंतरावर ‘सेल्फी पॉइंट’ उभारा, अशी सूचना पालिका प्रशासनाने या सर्व राजकीय पक्षांना केली आहे. 
येथे असतील ‘सेल्फी पॉइंट’
शिवाजी पार्कवर मनसेच्या मूळ जागेतच ‘सेल्फी पॉइंट’ सुरू ठेवता येईल, तर भाजपाला त्यापासून थोड्या अंतरावर जागा देण्यात येणार आहे. शिवसेनेला स्काउट पेव्हेलियनच्या बाहेर जागा देण्यात आली आहे. 

 आणखी वाचा 
 
आपण या स्पर्धेत मागे पडू नये म्हणून मग  शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी फलकबाजी करत सेल्फी पॉइंट उभारण्याची घोषणा केली. तो पर्यंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने सेल्फी पॉईंट सुरु करण्यात येत असल्याचा फलक लागले होते. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी तिन्ही पक्षांनी सुरु केलेले हे सेल्फीश राजकारण हातघाईवर येऊ नये यासाठी अखेर पालिकेने तिघांना 50 फुटाच्या अंतराने सेल्फी पॉईंट उभारण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. 
 
स्टडी पॉईंट उभारण्याची परवानगी द्या - राष्ट्रवादीचीही उडी
दरम्यान ' सेल्फी पॉईंट'च्या या वादात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही उडी मारली आहे. शिवसेना, मनसे आणि भाजपा सेल्फी पॉईंटच्या जागेसाठी लढत असताना राष्ट्रवादीवे तिथे ' स्टडी पॉईंट उभारण्याची' घोषणा करत त्यासाठी परवानगी मागितली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा पॉईंट उभारण्यात येईल, असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले आहे.

Web Title: Shivsena, MNS, BJP's 'Selfish' point