शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'आमचे उद्योग पळवणे आधी बंद करा'; सुभाष देसाईंची अमित शहांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:41 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्या टीकेला आता शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'केंद्र सरकार आणि गुजरातने महाराष्ट्रातील उद्योग पळवणे बंद करावे', असा हल्लाबोल सुभाष देसाईंनी केला आहे.

आज सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमित शहांवर हल्लाबोल केला आहे. 'राज्याला गतवैभव मिळवून देण्यात राज्य सरकार हतबल ठरतंय, अस शहा म्हणाले होते. पण, आधी राज्याचे असलेले वैभव पळवून नेण्याचे काम केंद्राने व गुजरातने थांबवावे. केंद्राकडून नेहमी राज्यावर अन्याय केला जातो. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही उद्योगांची पळवापळवी झाली. ते गप्प बसले, आम्ही गप्प बसणार नाही', असा इशारा देसाई यांनी दिला.

महाराष्ट्राला फक्त दोनच मेडिकल कॉलेज देसाई पुढे म्हणाले, भाजपच्या काळात राज्यासाठी केवळ दोन मेडिकल कॉलेज मंजूर झाले. यूपीला मात्र 27 मेडिकल कॉलेज मंजूर झाली. याकरता युपीला 2700 कोटी व महाराष्ट्राला फक्त 263 कोटी दिले गेले. सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असतानाही सर्वात कमी रेमडेसीवर दिल्या. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला तात्काळ मंजूरी द्या, असं सांगतानाच तुमच्या आवडीचे सरकार नसले तरी तुमच्या निर्णयांचा फटका जनतेला बसतोय, असंही देसाई म्हणाले.

अनेक संस्था राज्यातून हलवल्याकोरोना काळात आम्ही 2 लाख कोटी रुपये आणले. जागतिक आर्थिक केंद्राचा मान हा मुंबईलाच हवा. कारण आर्थिक केंद्र हे मुंबईतच आहे. पण गिफ्ट त्यांनी गुजरातला सुरू केले. दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण संस्था नागपुरात होती, ती दिल्लीला हलवली गेली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचे सर्व पुरावे देवूनही केंद्र सरकार निर्णय घेत नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईAmit Shahअमित शाहShiv SenaशिवसेनाBJPभाजपा