शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Aditya Thackeray: 'आमचे हिंदुत्व थोडे वेगळे; गद्दारांना पुन्हा जागा नाही', आदित्य ठाकरेंनी तोफ डागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 14:46 IST

Aditya Thackeray: 'मी आजोबांकडून हिंदुत्व शिकलो, आमच्या हिंदुत्वात बलात्काऱ्यांची आरती केली जात नाही.'

मुंबई: शिवसेनेने भाजपसोबत असलेली युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हापासून भाजप सातत्याने शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत आले आहे. यासोबतच शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हावरुन सध्या रज्यात राण पेटलंय. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यामुळे, दोन्ही गटांना पर्यायी चिन्ह देण्यात आले आहे. या गोंधळात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आजतकशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गुजरातच्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडण्यावरुन भाजप आणि गुजरात सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे?उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बिल्किस बानोच्या गुन्हेगारांना सोडल्याचा उल्लेख केल्यानंतर, शिवसेना धर्मनिरपेक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मी आजोबांकडून जे हिंदुत्व शिकलो, त्यात बलात्कार करणाऱ्याची आरती-पूजा केली जात नाही. जो बलात्कारी असेल, त्याला फाशीच द्यायला हवी, हे माझ्या आजोबांचे हिंदुत्व होते. मग तो कोणत्याही धर्माचा असो. बलात्काऱ्याचा धर्म, प्रांत, जात, भाषा न पाहता फाशी द्यावी,' अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली. 

'आमचे हिंदुत्व थोडे वेगळे आहे'ते पुढे म्हणतात की, 'आमच्या धर्माविरोधात कोणी येत असेल, तर आम्ही त्याविरोधात उभे राहू. पण, आमचा धर्म सर्वांची सेवा करा, सर्वांना सोबत घेऊन चाला, हेच शिकवतो. हिंदुत्वाचा विचार केला तर, उद्धव ठाकरे यांनी जितके वेळेस अयोध्येला भेट दिली, तितकी क्वचितच संपूर्ण देशातील कोणीही भेट दिली असेल. आमचे हिंदुत्व थोडे वेगळे आहे. आम्ही औरंगाबादचे नाव बदलले, उस्मानाबादचे नाव बदलले तेव्हा हिंसाचार झाला नाही. हे आमच्या हिंदुत्वात आम्ही द्वेष पसरवत नाही.'

'गद्दारांना पुन्हा जागा नाही'उद्धव ठाकरेंची शिवसेना पुढची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत लढणार की, पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करणार की, शिंदे गटासोबत लढवणार? या प्रश्‍नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, 'गद्दारांना पुन्हा जागा दिली जाणार नाही. त्यांच्या जागेवर, ते निवडून येतील का, हा प्रश्न त्यांना विचारयाल हवा. अनेकांनी आता निवृत्तीची योजना तयार केली आहे. कोणासोबत निवडणूक लढवायची, हा निर्णय वरिष्ठ घेतील,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा