शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Kishori Pednekar : "कधी कधी प्रश्न पडतो आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?"; किशोरी पेडणेकरांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 13:51 IST

Shivsena Kishori Pednekar Slams BJP Ashish Shelar : शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांवर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्र सरकारला मोठा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम तब्बल 12 हजार कोटी रुपये आहे. यावरून  भाजपानेशिवसेना आणि आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "सोशल मीडियावर "पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या" पेंग्विन सेनाप्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का?" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यानंतर आता शिवसेनेने याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Shivsena Kishori Pednekar) यांनी आशिष शेलारांवर हल्लाबोल केला आहे. आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का? असं म्हणत घणाघात केला आहे. तसेच प्रत्येक वेळी सोयीनुसार शब्द बदलणारे जर कोण असतील तर ते शेलार असतील म्हणून त्यांचं डोकं ठिकाणावर नाही असं वाटतं असंही सांगितलं. "शेलार महापालिका करून गेलेले आहे. कधी कधी प्रश्न पडतो आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?... शेजारच्या गल्लीमध्ये मांजरीने बाळं दिली तरी सांगतील ही शिवसेनेमुळे झाली, इतकं डोकं फिरलेलं आहे."

"प्रत्येक वेळी सोयीनुसार शब्द बदलणारे जर कोण असतील तर ते आशिष शेलार"

"मला असं वाटतं लवादा हा राज्य सरकारच्या अखत्यारित येतो हे नक्कीच आहे. मुंबई महानगरपालिकेने कचरा सिस्टमवर अनेकदा काम केलंय, त्याचं तुम्ही स्वत: कौतुक देखील केलं आहे. प्रत्येक वेळी सोयीनुसार शब्द बदलणारे जर कोण असतील तर ते आशिष शेलार असतील म्हणून त्यांचं डोकं ठिकाणावर नाही असं वाटतं" असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या पेंग्विन सेनाप्रमुखांकडून हा दंड वसूल करायचा का?"

आशिष शेलार यांनी "कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. प्रदूषणमुक्त वातावरण देणे ही राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे, असे लवादाने म्हटलेय. हा दंड दोन महिन्यात भरायचा आहे, मग आता... सांग सांग भोलानाथ... हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून...अडीच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून... सोशल मीडियावर "पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या" पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Kishori Pednekarकिशोरी पेडणेकरAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv Senaशिवसेना