भाजपाकडून शिवसेनेची कोंडी

By Admin | Updated: November 13, 2014 00:57 IST2014-11-13T00:57:01+5:302014-11-13T00:57:01+5:30

जुन्या मित्रने ठेंगा दाखविल्यानंतर अचानक स्वाभिमानाचा साक्षात्कार झालेल्या शिवसेनेने विधानसभेत विरोधकांचे नेतृत्व स्वीकारल़े

Shivsena Kandi from BJP | भाजपाकडून शिवसेनेची कोंडी

भाजपाकडून शिवसेनेची कोंडी

मुंबई :  जुन्या मित्रने ठेंगा दाखविल्यानंतर अचानक स्वाभिमानाचा साक्षात्कार झालेल्या शिवसेनेने विधानसभेत विरोधकांचे नेतृत्व स्वीकारल़े मात्र महापालिकेत सत्तेवर राहूनच शिवसेनेची कोंडी करण्याची नीती भाजपाने अवलंबली आह़े त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांचे 
धाबे दणाणले असून त्यांच्यापुढील अडचणी आणि आव्हानेही वाढली आहेत़
विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून शिवसेना-भाजपाची 25 वर्षाची युती तुटली़ त्यानंतर भाजपा निवडून येताच सत्तेसाठी तळ्यात-मळ्यात करीत अखेर शिवसेना विधानसभेत आज विरोधी बाकावर बसली़ मात्र मुंबई महापालिकेत अद्याप युती तोडण्याचा निर्णय उभय पक्षांतून घेण्यात आलेला नाही़ 
तरीही सत्तेत राहूनच शिवसेनेला 
जेरीस आणण्याचे भाजपाचे मनसुबे स्थायी समितीच्या बैठकीत आज दिसून आल़े
डेंग्यू नियंत्रणात आणण्यात पालिका सपशेल अपयशी ठरल्याचे टीकास्त्र विरोधी पक्षांनी सोडल़े यात भाजपानेही सुरात सूर मिसळत महापौर रुग्णालयांचे दौरे करताना स्थानिक नगरसेवकांनाही कळवत नाहीत, अशी नाराजी भाजपाचे दिलीप पटेल यांनी व्यक्त केली़    डेंग्यूप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादीने सभात्याग करताच भाजपानेही शिवसेनेला एकटे टाकून बाहेरचा रस्ता धरला़ त्यामुळे कपाळावर हात मारून घेण्याची वेळ शिवसेनेवर आली़ 
सेनेचे रिकाम्या खुच्र्याना प्रत्युत्तर
भाजपाने हल्ला चढवत सभात्याग केल्यानंतर हात चोळत बसलेल्या शिवसेनेने प्रत्युत्तर दिले खऱे मात्र त्यांचा बचाव ऐकण्यासाठी विरोधी बाक व मित्रपक्षातही सदस्य उपस्थित नव्हत़े मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस पालिकेच्या केईएम रुग्णालयात भेट देऊन गेले तेव्हा महापौर स्नेहल आंबेकर यांना बोलाविण्यात आले नव्हते, याचे स्मरण सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव 
यांनी रिकाम्या खुच्र्याना करून 
दिल़े (प्रतिनिधी)
 
शिवसेना आणि भाजपातील वाद नवीन नाही़ यापूर्वीही उभय पक्षांमध्ये अनेक वेळा खटके उडाले होत़े मात्र हे वाद कालांतराने ज्येष्ठ नेत्यांकडून मिटवले जात होते.
 
च्2क्12 मध्ये शिवसेनेने मालमत्ता कराची माहिती घेण्यासाठी महापौर बंगल्यावर स्वतंत्र बैठक बोलावल्याने भाजपानेही लगेचच दुस:या दिवशी पालिका मुख्यालयात स्वपक्षीय सदस्यांसाठी बैठक बोलाविली़ 
च्पाणीप्रश्नावर भाजपाने विरोधी पक्षाच्या बरोबरीने स्थायी समिती तहकूब करण्यास सत्ताधा:यांना भाग पाडले होत़े
च्वाहनांची संख्या कमी असल्याने मुंबईत पेटलेल्या कच:याच्या प्रश्नावर स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजपामध्ये गतवर्षी खटके उडाले होत़े
च्शिवसेनेच्या पुढाकाराने आणलेल्या पॉटहोल ट्रॅकिंग पद्धतीला भाजपाने विरोध केला आह़े
च्गोरेगाव येथे वृक्षतोडणीवरूनही भाजपा 
आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात उभे 
ठाकले होत़े
 
भाजपाची 
सावध खेळी
पालिकेत शिवसेनेचे 75 संख्याबळ असून भाजपाकडे 31 नगरसेवक आहेत़ भाजपाने फारकत घेतल्यास मनसेचे 27 नगरसेवक आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर शिवसेना तरेल़ हे ओळखून पालिकेत भाजपाने अद्याप सत्तेत राहून सावध खेळी करण्यास सुरुवात केली आह़े त्यामुळे शिवसेनेची मात्र चांगलीच कोंडी झाली आह़े 

 

Web Title: Shivsena Kandi from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.