सुरुवात शिवसेनेनं केली, अंत आम्ही करू - भाजपा

By Admin | Updated: October 12, 2016 18:31 IST2016-10-12T18:28:24+5:302016-10-12T18:31:21+5:30

ही लढाई अधिक तिव्र होईल. सुरवात त्यांनी केली आहे, अंत आम्ही करु. जशास तसं उत्तर दिले जाईल. असा इशारा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला आहे.

Shivsena initiated, finally we will - BJP | सुरुवात शिवसेनेनं केली, अंत आम्ही करू - भाजपा

सुरुवात शिवसेनेनं केली, अंत आम्ही करू - भाजपा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मुलुंडमध्ये महापालिकेतील भ्रष्टाचाराचा रावण दहन हा भाजपाचा अधिकृत कार्यक्रम होता. शिवसेनेनं त्यात अडथळा आणायची काय गरज होती? असा प्रश्न विचारत यापुढे ही लढाई अधिक तिव्र होईल. सुरवात त्यांनी केली आहे, अंत आम्ही करु. जशास तसं उत्तर दिले जाईल. असा इशारा भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला आहे. काल रात्री शिवसेना-भाजपात जोरदार राडा झाला होता. त्याधर्तीवर मुलुंड येथे खासदार किरीट सोमिया यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी आज भेट घेतली.

भ्रष्ट्राचार,माफिया यांच्याविरोधातील लढाईत पक्ष आपल्या सोबत आहे. असा विश्वास त्यांनी दिला. त्यानंतर मुलुंड येथे कालच्या घटनेत जखमी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांचीही मुंबई भाजप अध्यक्ष आ. अ‍ॅड आशिष शेलार यांनी भेट घेतली. रुग्ण्यालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांच्या लढाईत आम्ही मागे हटणार नाही. भ्रष्टयाचाराच्या विरोधात भाजप आवाज उठवतच राहणार. माफियांच्या विरोधात आम्ही रावण दहन केले त्याची टोपी त्यांनाच कशी फिट बसली ?

Web Title: Shivsena initiated, finally we will - BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.