शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

...तर एकनाथ शिंदेंना उलटं टांगलं असतं; गद्दार संपणार, चंद्रकांत खैरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 09:19 IST

आमच्यावर जे संकट आले आहे त्याचा सामना करणार आहोत. उद्धव ठाकरे हे संयमी आणि संघर्षमय नेतृत्व आहेत. त्यामुळे आम्ही संघर्ष करत राहू असं खैरे म्हणाले.

औरंगाबाद - एकनाथ शिंदेंचा मला भयंकर राग आलाय. या रिक्षावाल्याने इतके पैसे कुठून कमावले? शिवसेना फोडण्याचे काम केले. आनंद दिघे असते तर गद्दारी केल्यामुळे तुला उलटा टांगला असता. आनंद दिघेंच्या नावावर हे सगळं करतोय. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा भविष्यात विजय होणार आहे. ज्यांनी गद्दारी केली ते संपले हा इतिहास आहे अशा शब्दात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संतप्त भूमिका मांडली आहे. 

चंद्रकांत खैरे म्हणाले की, माझ्या शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण कायम राहणार आहे. शिंदेंना धनुष्यबाण मिळू शकत नाही. केंद्रात मोदी सरकार आहे ते हे करणार असेल तर २०२४ मध्ये जनता धडा शिकवेल. शिवसेना संपवण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे. आमच्यासारख्या शिवसैनिकांना बाळासाहेबांनी मोठे केले. त्याची जाण आम्हाला आहे. गद्दारांना नसेल. परमेश्वर तुम्हाला कधी माफ करणार नाही. संघर्ष, संकटे येतात पण शिवसेना संपली नाही. संपणार नाही. बाळासाहेबांवर अनेक संकटे आली होती असंही त्यांनी सांगितले. 

तसेच आमच्यावर जे संकट आले आहे त्याचा सामना करणार आहोत. उद्धव ठाकरे हे संयमी आणि संघर्षमय नेतृत्व आहेत. त्यामुळे आम्ही संघर्ष करत राहू. एकनाथ शिंदे आणि ४० गद्दारांनी शिवसेना फोडण्याचं महापाप केले आहे. अनेक शिवसैनिक दुखावले गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा संघर्ष करू आणि जिंकून येऊ असा प्रण केला आहे असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं. 

भाजपा कुठेही दिसणार नाहीमी रात्रभर झोपलो नाही. देवा हे काय केलंस तू? बंदोबस्त कर देवा. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी ते संपणार आहेत. निवडणूक आयोग यंत्रणा केंद्राच्या हातात आहे. हा लोकशाहीचा खून आहे. अंधेरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकून येणारच. साधा रिक्षावाला कोट्यवधी रुपये छापले. उद्धव ठाकरेंनी केवळ हात वर केला. याचे परिणाम भयानक होतील. भाजपा कुठेही दिसणार नाही. एकनाथ शिंदे संपणार आहे असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.  

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे