शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Deepak Kesarkar Press Conference: "आम्ही राजीनामा मागितलेलाच नाही, फक्त 'युती'ची विनंती केलीय"; शिंदेगटाने सांगितलं बंड नेमकं कशासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 17:52 IST

एकनाथ शिंदे गटाकडून दीपक केसरकरांनी मांडली बाजू

Deepak Kesarkar Press Conference: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष काही केल्या संपताना दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या सुमारे १५ ते २० आमदारांनी सुरूवातीला सुरत येथे ठाण मांडले आणि शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच भाजपासोबत पुन्हा नैसर्गिक युती करून नवीन सरकार स्थापन करण्याचीही मागणी केली. हा विचार पटल्याने हळूहळू शिंदे गटातील बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली आणि आता सुमारे ३८ आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्यापैकी, दीपक केसरकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागितलेलाच नाही, याचीही त्यांनी साऱ्यांना आठवण करून दिली.

"आमची मनं साफ आहेत. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. आम्ही विनंती केली होती की शिवसेना-भाजपाने एकत्र यावं. ते म्हणतात, मी राजीनामा देतो. राजीनामा कुणी मागितलेला नाही. त्यांना भावनिक वळण द्यायचं आहे. ते नेते आहेत. बाळासाहेबांनंतर त्यांनी पक्ष चालवला आहे. त्यांच्याकडून आम्हाला वेगळ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात, एवढीच अपेक्षा आहे", असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, "उद्धव ठाकरे यांना आम्ही सुरूवातील भेटायला गेलो होतो. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी संवाद साधला होता. मी स्वत: उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. पाच सीनिअर मंत्रीही भेटले होते. त्यामुळे मला वाटतं की अजूनही त्यांनी आमच्या मागणीवर विचार करावा", असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेतील इतर मुद्दे-

>> उद्धव ठाकरे प्रत्येकाला समजून घेतात, पण निर्णय घेण्यासाठी जो वेळ घेतात, त्यात नाराजी वाढते. >> संघटना कोणीच तोडत नाही. आम्ही त्याच संघटनेचे सदस्य होतो, आहोत आणि राहू.>> मी आमच्याच नेतेमंडळींवर काही आरोप करणार नाही. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.>> आमच्यापैकी कुणीही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाही.>> आदित्य ठाकरे आमच्यासोबत जेव्हा बसमध्ये होते. त्यांनाही आम्ही सगळं समजावून सांगितलं होते. >> शिवसेना आणि भाजपा एकत्रच राहिलं पाहिजे हे मी पहिल्यापासून सांगतोय.>> पंतप्रधानांना विशेष प्रेम शिवसेनेबदद्ल आणि बाळासाहेबांबद्दल आहे.>> कोणाच्याच नावाने मतं मागितलेली नाही. आम्ही अन्य पक्षातूनही निवडून आलो आहोत. फक्त शिवसेनेच्या नावावर निवडून येत असते तर सगळे निवडून आले असते.>> उमेदवारा देखील कामं करतात त्यामुळे त्यांचेही मूल्य जनतेत असते.>> केवळ पक्षाचं ठराविक मतदान नसतं.>> आजच्या विधानसभेतील किमान ७० ते ८० किंवा १०० उमेदवार कुठल्याही चिन्हावर निवडून येऊ शकतात कारण ते लोक मतदारसंघात आणि जिल्ह्यात काम करतात.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा