शिवसेनेला पराभव दिसतोय!
By Admin | Updated: October 15, 2014 03:25 IST2014-10-15T03:25:56+5:302014-10-15T03:25:56+5:30
शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्या पक्षाच्या नेत्यांना पराभव समोर दिसत असल्याने ते भाजपावर टीका करीत असल्याची टीका भाजपाचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी केली
_ns.jpg)
शिवसेनेला पराभव दिसतोय!
मुंबई : शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्या पक्षाच्या नेत्यांना पराभव समोर दिसत असल्याने ते भाजपावर टीका करीत असल्याची टीका भाजपाचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी केली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा प्रमुख शत्रू भाजपा हाच असून, युती तोडण्याचे मारेकरी अमित शहा हेच आहेत, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली होती.
रुडी म्हणाले की, शिवसेना, मनसे असो की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांना आपला पराभव दिसत असून, भाजपाला भक्कम बहुमत मिळणार आहे, त्यांच्या आरोपांवर भाष्य करणार नाही.