शिवसेना-काँग्रेसचे व्हॅलेंटाइन फिक्स - तावडे
By Admin | Updated: February 14, 2017 16:18 IST2017-02-14T16:18:00+5:302017-02-14T16:18:00+5:30
मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. विशेषता शिवसेना-भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यरोप संपतचं नाहीत

शिवसेना-काँग्रेसचे व्हॅलेंटाइन फिक्स - तावडे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. विशेषता शिवसेना-भाजपा यांच्यातील आरोप-प्रत्यरोप संपतचं नाहीत. आजचा व्हॅलेंटाईनचा मुहुर्तु साधत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेनेची आतून युती झाली आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-शिवसेनेची अभद्र युती झाली आहे. शिवसेना-काँग्रेसचे व्हॅलेंटाइन फिक्स झालेलं आहे. काँग्रेसने शिवसेनेला 40 जागांवर गिफ्ट दिलं, तर सेनेनं काँग्रेसला दहा जागांवर गिफ्ट दिलं असल्याचे तावडे म्हणाले.