शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Bhaskar Jadhav : "रामदास कदमांना योग्यवेळी एकदा रोखठोक उत्तर देणार", भास्कर जाधवांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 16:04 IST

Shivsena Bhaskar Jadhav Slams Ramdas Kadam : शिवसेनेचं काही चुकतं का? असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारण्यात आला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडत असल्याचं चित्र निर्माण झालं. कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे शिंदे गटात उघडपणे सहभागी झाले. रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. "52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. याच दरम्यान भास्कर जाधव य़ांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"रामदास कदम (Ramdas Kadam) य़ांना योग्यवेळी एकदा रोखठोक उत्तर देणार" असा इशारा भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांनी दिला आहे. शिवसेनेचं काही चुकतं का? असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारण्यात आला होता. त्यावर "याबाबत सविस्तर मी एकदा बोलणार आहेत. परंतू आज मी सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे, सगळी परिस्थिती मी पूर्णपणे नजरेखालून घालतोय. कोण कोण कशाबाबतीत यासंदर्भात आपापली मतं मांडतोय हे मी बघतोय. रामदास कदमांना मला एकदा रोखठोक उत्तर द्यावं लागेल आणि ते योग्यवेळी मी देणार आहे" असं म्हटलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

रामदास कदम यांनी "मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होतं वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असं सांगितलं होतं. बाळासाहेबांनी हिंदुत्व वाढवलं. ही बाळासाहेबांची शिवसेनाची नाही, शरद पवारांनी डाव साधला, उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही. शरद पवारांनी पक्ष फोडला" असं म्हटलं आहे. 

"उद्धव साहेबांनी नोंद घेतली असती तर एकनाथ शिंदेंसह 51 आमदारांवर ही वेळच आली नसती. किती जणांची हकालपट्टी करणार त्यापेक्षा तुमच्या आजुबाजुला कोण आहे ते आधी पाहा... कोण बैल म्हणतो, कोण, कुत्रे म्हणतोय मग आमदार चिडले... मी एकनाथ शिंदे गुवाहाटीला असताना बोललो... प्रयत्न केले पण यश आले नाही. मराठी माणूस जगला पाहिजे. शिवसेना जगली पाहिजे, आमच्यासारखा कडवा सैनिक का जातो? हे पाहिलं पाहिजे" असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवShiv SenaशिवसेनाRamdas Kadamरामदास कदमPoliticsराजकारण