शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

"शिवसेना... नाते जिव्हाळ्याचे, स्नेहाचे, पिढ्यापिढ्यांचे"; अरविंद सावंतांनी शेअर केला 'तो' खास Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 13:13 IST

Shivsena Arvind Sawant : शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी ट्वीटर अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. एका छोट्या शिवसैनिकाचा हा व्हिडीओ असून तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

मुंबई - शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आता एकीकडे आदित्य ठाकरे राज्यात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. तर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा आणि गाठीभेटींचा धडाकाच लावला आहे. अनेक वर्षांनंतर ते शिवसेना शाखेतही जाताना दिसून ये आहेत. उद्धव ठाकरेंनी रविवारी शिवडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना भाजपा आणि बंडखोर नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. तसेच, शिवसेना फोडण्याचा नाही, तर संपविण्याचा हा डाव असल्याचंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून भाषण करताना भाजपावर जोरदार प्रहार केला. 

शिवसेना फोडण्याचा नाही, तर हा संपविण्याचा डाव आहे. मात्र, शिवसेना पुरुन उरेल आणि संपविणाऱ्यांना पाताळात गाडेल, अशा शब्दांत भाजपावर हल्लाबोल केला. याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (Shivsena Arvind Sawant) यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. एका छोट्या शिवसैनिकाचा हा व्हिडीओ असून तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अरविंद सावंत यांनी शिवसेना... नाते जिव्हाळ्याचे, स्नेहाचे... पिढ्यापिढ्यांचे...! असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. 

व्हिडिओमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवण्यात य़ेत आहे. ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली आहे. या गर्दीमध्ये एक छोटा शिवसैनिक मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. वडिलांच्या खांद्यावर बसलेला हा लहान मुलगा उद्धव ठाकरेंच्या भाषणावर जोरजोरात टाळ्या वाजवताना, जयजयकार करताना दिसत आहे. अरविंद सावंत यांनी आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर अकांऊटलाही हा व्हिडीओ टॅग केला असून सध्या व्हिडिओतल्या चिमुकल्याची चर्चा रंगली आहे. 

"शिवसेना संपली असं म्हणणाऱ्यांनी जरा एकदा इथं पाहावं. उपस्थित असलेले कार्यकर्ते माझी ताकद आहेत. 'वर्षा'वरुन निघालो असलो तरी मातोश्री परतल्यानंतर मला माझी खरी शक्ती मिळाली आहे. शिवसैनिक ही माझी खरी ताकद आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, अरविंद सावंत यांना किशोरी पेडणेकरांनी गणपती बाप्पाची, मंगलमूर्ती भेट म्हणून दिली. गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे. मी गणरायाकडे साकडं घालतोय की तुझ्या आगमनाआधी हे संकट आणि आरिष्ट्य मोडून शिवसेनेचा भगवा पुन्हा महाराष्ट्रावर फडकू देत. हिंदुस्थानावर फडकू देत, आता खरा भगवा कोणता हे दाखवण्याची वेळ आली आहे", असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण