मोबाइलवर मिळणार शिवनेरीचे ‘अपडेट’

By Admin | Updated: June 24, 2015 02:26 IST2015-06-24T02:26:55+5:302015-06-24T02:26:55+5:30

आता प्रवाशाला शिवनेरीची सद्य:स्थितीविषयीची म्हणजेच बस कुठे पोहोचली आहे याची माहिती मोबाइलवर, डेपोत आणि प्रत्यक्षात शिवनेरीतील डिस्प्ले बोर्डवर मिळणार आहे.

Shivneri 'updates' on mobile | मोबाइलवर मिळणार शिवनेरीचे ‘अपडेट’

मोबाइलवर मिळणार शिवनेरीचे ‘अपडेट’

मुंबई : आता प्रवाशाला शिवनेरीची सद्य:स्थितीविषयीची म्हणजेच बस कुठे पोहोचली आहे याची माहिती मोबाइलवर, डेपोत आणि प्रत्यक्षात शिवनेरीतील डिस्प्ले बोर्डवर मिळणार आहे.
एसटी महामंडळाकडे सध्या ११० शिवनेरी आहेत. काही बस बिघडल्यामुळे महामंडळाकडून ७० नव्या एसी बस घेण्यात येणार आहेत.
मुंबई-पुणे, ठाणे-पुणे, औरंगाबाद-पुणे अशा मोजक्याच मार्गांवर एसी शिवनेरी बस धावतात. शिवनेरीच्या प्रवाशांना बसची सद्य:स्थिती कळावी यासाठी ‘प्रवासी माहिती सुविधा’ देण्यात येणार आहे. शिवनेरीचे मोबाइल अ‍ॅप विकसित केले जाणार असून हे नि:शुल्क अ‍ॅप प्रवाशांना डाऊनलोड करावे लागेल. बसची सुटण्याची आणि येण्याची वेळ, थांबे, बस कुठवर पोहोचली आहे, याची माहिती प्रवाशांना या अ‍ॅपद्वारे समजेल. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी ही माहिती दिली. ही सेवा येत्या तीन महिन्यांत सुरू होणार आहे.

Web Title: Shivneri 'updates' on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.