शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Shivneri Shiv Jayanti: शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर चेंगराचेंगरी, महिला, मुलांसह अनेक शिवभक्त जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 08:40 IST

Shiv Jayanti Shivneri Fort Stampede: शिवजयंती सोहळ्यादरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली असून, यात अनेक शिवभक्त जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

राज्यभरात आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे.  शिवछत्रपतींचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरही शिवजयंतीसाठी शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यादरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली असून, यात अनेक शिवभक्त जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिवजयंती सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागातून शिवभक्त  कालपासूनच मोठ्या प्रमाणावर शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले होते. यादरम्यान, मध्य रात्रीच्या सुमारास अंबरखान्याच्या खाली असलेल्या हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. येथील अरुंद वाटेवर हजारो लोक जमल्याने परिस्थिती बिगडली. अरूंद वाद आणि मोठ्या प्रमाणावर झालेली गर्दी यामुळे येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेली पोलीस यंत्रणाही अपुरी पडली आणि चेंगराचेंगरी झाली. गर्दीमुळे उडालेला गोंधळ आणि चेंगराचेंगरीमुळे लोकांमभे भीतीचं वातावरण निर्माण झालं. तसेच अनेकजण एकमेकांवर पडून चिरडले गेले.

या चेंगराचेंगरीमध्ये काही महिला आणि मुले जखमी झाली आहेत. जखमींना उपचारांसाठी जुन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या चेंगराचेंगरीत कुणालाही फार मोठी दुखापत झालेली नाही. तसेच डॉक्टर या जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.      

English
हिंदी सारांश
Web Title : Shivneri Stampede During Shiv Jayanti: Many Injured, Including Women, Children

Web Summary : Stampede at Shivneri Fort during Shiv Jayanti celebrations injured many devotees, including women and children. Overcrowding in narrow areas led to the incident. Injured are receiving treatment in Junnar.
टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीPuneपुणेStampedeचेंगराचेंगरी