शिवेंद्रसिंहराजेंवर मारहाणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2016 04:20 IST2016-12-24T04:20:03+5:302016-12-24T04:20:03+5:30

विकासकामांची प्रत फाडून एकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह तिघांवर मेढा

Shivendra Singh's crime of assault | शिवेंद्रसिंहराजेंवर मारहाणीचा गुन्हा

शिवेंद्रसिंहराजेंवर मारहाणीचा गुन्हा

सातारा : विकासकामांची प्रत फाडून एकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह तिघांवर मेढा पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.
याबाबत गणेश साईबाबा जगताप (वय ३२, रा. भणंग, ता. जावळी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी दुपारी भणंग येथील पाण्याच्या टाकीशेजारी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. या वेळी हा प्रकार घडला. (प्रतिनिधी)

Web Title: Shivendra Singh's crime of assault