शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमचं दोघांचंही घराणं एकच... छत्रपतींचं घराणं; शिवेंद्रराजे-उदयनराजेंच्या मनोमीलनाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 15:56 IST

शिवेंद्रराजेंकडून उदयनराजेंसोबतचा वाद मिटण्याचे संकेत

सातारा: शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटण्याचे संकेत खुद्द छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. मला फक्त आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभेची तयारी करत आहे, असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं. आमची दोन घराणी नाहीत, छत्रपतींचं घराणं एकच आहे, असं म्हणत त्यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले आहेत. माझी निष्ठा शरद पवारांवर आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायल्या मिळाल्या आहेत. त्यांचा सहवास आधी मिळाला असता, तर बरंच काही शिकता आलं असतं असं वाटतं. मला आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागलो आहे, असं आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात म्हटलं. छत्रपतींचं घराणं एकच आहे. त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, अशी कोणतीही कृती माझ्याकडून घडणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी उदयनराजेंसोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले. थोरांचे आशीर्वाद ! 'आय लव्ह यू' म्हणणाऱ्या उदयनराजेंचा आजीबाईंनी घेतला 'मुका'शिवेंद्रराजे आणि उदयनेराजे या दोन छत्रपतींमधील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघेजण एका कार्यक्रमात आमने-सामने आले होते. त्यावेळी त्यांनी एकमेकांची चौकशी केली होती. त्यावेळी झालेला संवाददेखील शिवेंद्रराजेंनी सांगितला. त्यावेळी उदयनराजेंनी माझा खांदा वारंवार दाबला. त्यावेळी सारखा खांदा का दाबता, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर तब्येत बघतोय, असं उत्तर त्यांनी दिलं. त्यानंतर माझा व्यायाम व्यवस्थित सुरू आहे, असं मी त्यांना सांगितलं, अशा शब्दांमध्ये त्यावेळी झालेला संवाद शिवेंद्रराजेंनी सांगितला. उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा दाबला...दोन्ही राजे आमनेसामने...पाहा काय घडले पुढेछत्रपतींच्या घराण्यातील असल्यानं आम्हाला मोठं वलय मिळालं आहे. आम्ही आमदार-खासदार आहोत म्हणून आम्हाला मान-सन्मान मिळतो अशातला भाग नाही. तर छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्ती असल्यानं आम्हाला प्रतिष्ठा मिळते. आमची दोन घराणी नाहीत. आमचं घराणं एकच आहे आणि ते म्हणजे छत्रपतींचं घराणं. या घराण्याच्या प्रतिष्ठेला माझ्या वर्तणुकीमुळे कधीही धक्का लागू देणार नाही. छत्रपतींच्या घराण्यातले असल्यानं लोकांना आमच्यावर विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं शिवेंद्रराजे म्हणाले.लोकांपेक्षा कोणी मोठा नाही

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार