शिवछत्रपती राज्य क्रिडा जीवन गौरव पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: October 21, 2015 21:47 IST2015-10-21T21:46:44+5:302015-10-21T21:47:21+5:30
महाराष्ट्र सरकारचे शिवछत्रपती राज्य क्रिडा जीवन गौरव पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये लातूरचे गणपतराव माने आणि पुण्याचे रमेश विपट यांची निवड करण्यात आली आहे.

शिवछत्रपती राज्य क्रिडा जीवन गौरव पुरस्कार जाहीर
ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि.२१ - महाराष्ट्र सरकारचे शिवछत्रपती राज्य क्रिडा जीवन गौरव पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये लातूरचे गणपतराव माने आणि पुण्याचे रमेश विपट यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य सरकारने २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रिडा जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला. यात १०१२-१३ साठी रमेश विपट आणि २०१३-१४ साठी गणपतराव माने यांना जाहीर करण्यात आला. शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार हा क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.