शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 10:34 IST

लोकसभा निवडणुकीची  निवडणूक लढवण्याबाबत मनसेमध्ये  खल सुरू होता. मात्र बराच काळ निर्णय होत नव्हता. तीन पक्षांच्या युतीत आपल्याला अपेक्षित स्थान मिळणार नाही, याची जाणीव होताच मनसेने निवडणूक न  लढवण्याचा निर्णय घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना  हा पक्ष  लोकसभेच्या रिंगणात उतरणार होता. त्यादृष्टीने सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी पालिकेकडे अर्जही केला होता, तो अर्ज मान्यही झाला  आहे. मात्र मनसे निवडणूकच लढवत नसल्याने शिवाजी पार्कचे मैदान आरक्षित मनसेसाठी; परंतु १७ मे रोजी सभा मात्र होणार महायुतीची, अशी गंमत आहे! 

या सभेच्या मंचावर  पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  अजित पवार यांच्यासह मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे असतील. महायुतीचे मुंवईतील उमेदवारही मंचावर  असतील. परंतु ज्या पक्षाच्या, अर्थात मनसेच्या नावावर मैदान आरक्षित झाले, त्या पक्षाचा एकही उमेदवार मंचावर नसेल. राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे मैदानही त्यांनी बिनशर्त दिले आहे. 

लोकसभा निवडणुकीची  निवडणूक लढवण्याबाबत मनसेमध्ये  खल सुरू होता. मात्र बराच काळ निर्णय होत नव्हता. तीन पक्षांच्या युतीत आपल्याला अपेक्षित स्थान मिळणार नाही, याची जाणीव होताच मनसेने निवडणूक न  लढवण्याचा निर्णय घेतला. मनसेने ज्या तारखेसाठी  शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला होता, तो अर्ज मान्य केला आहे. 

शिवाजी पार्क मिळावे म्हणून मनसेने  आणि उद्धवसेनेने अर्ज केला होता. मात्र, नगरविकास विभागाने मनसेला सभा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या मैदानासाठी आधी कुणी परवानगी मागितली होती, याची विचारणा उद्धवसेना नगरविकास विभागाकडे करणार आहे. जर उद्धवसेनेचे पत्र आधी गेले असेल तर नगरविकास विभागाच्या या निर्णयाला पक्ष न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४MNSमनसे