माहिती संचालकपदी शिवाजी मानकर
By Admin | Updated: July 16, 2015 22:36 IST2015-07-16T22:36:07+5:302015-07-16T22:36:07+5:30
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक, (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) या पदावर शिवाजी मानकर यांची शासनाने पदोन्नतीने नियुक्ती केली आहे.

माहिती संचालकपदी शिवाजी मानकर
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक, (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) या पदावर शिवाजी मानकर यांची शासनाने पदोन्नतीने नियुक्ती केली आहे. मानकर सध्या मंत्रालयात कार्यरत असून, यापूर्वी त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
मानकर यांची १९९१ साली जिल्हा माहिती अधिकारी या पदावर जालना येथे प्रथम नियुक्ती झाली होती. अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक विभागाचे उपसंचालक, पुणे व कोकण विभागाचे उपसंचालक तसेच मंत्रालयात उपसंचालक (वृत्त) म्हणून त्यांनी काम केले आहे. इस्रायल येथे झालेल्या जागतिक मराठी अकादमीच्या अधिवेशनात त्यांचे ‘आपला गाव’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून, त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे.