फेसबुकवर शिवाजी महाराजांची बदनामी

By Admin | Updated: June 1, 2014 01:02 IST2014-06-01T01:02:56+5:302014-06-01T01:02:56+5:30

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर व चित्रे फेसबुकवर आपलोड करण्यात आल्याचे शनिवारी उघडकीस आल़े

Shivaji Maharaj's slander on Facebook | फेसबुकवर शिवाजी महाराजांची बदनामी

फेसबुकवर शिवाजी महाराजांची बदनामी

>पुणो/औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर व चित्रे फेसबुकवर आपलोड करण्यात आल्याचे शनिवारी उघडकीस आल़े त्यानंतर राज्यात सर्वत्र संतापाची लाट पसरली असून, अनेक ठिकाणी नागरिकांकडून रास्तारोको करण्यात आला़ तर काही ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली़ 
फेसबुकवर शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाने पेज तयार करुन त्यावर आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यात आले होत़े त्यावरुन पुणो शहर व जिलत अनेक ठिकाणी कार्यकर्ते संतप्त झाल़े काही ठिकाणी बसगाडय़ांवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या़ 
पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी सांगितले,‘‘ कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या मजकुरावर लाईक करण्यांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल.’’ ‘महापोलीस’ या वेबसाईटवरुन हे फेसबुकवरील पेज ब्लॉक केले असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान, पोलीस प्रशासनाने गुगल कंपनीशी संपर्क साधून त्यांना हे पेज ब्लॉक करण्यास सांगितले आह़े दरम्यान औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी शिवप्रेमींनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. रविवारी सकाळी या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे क्रांतीचौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
 
येवल्यात बसवर दगडफेक
च्नाशिक : येवल्यात संतप्त युवकांनी एसटी महामंडळाच्यसा बसेससह खासगी वाहनांवर दगडफेक केली. या प्रकारामुळे येवला शहरात तणाव निर्माण झाला असून,  परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दंगा नियंत्रण दलास पाचारण करण्यात आले आहे. 
कुडरूवाडीत बसेस फोडल्या
च्कुडरूवाडी शहरात संतप्त शिवप्रेमीनी रात्री साडेनऊ वाजता राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. त्यात पाच बसचे मोठे नुकसान झाले. 

Web Title: Shivaji Maharaj's slander on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.