शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

'शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील अस्तित्व नाशिकवरच अवलंबून'; अजय बोरस्तेंनंतर हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:37 IST

आता या दोघांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटतात की श्रीकांत शिंदे यांनाच भेटून हात हलवत माघारी पाठविले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. दुसरीकडे छगन भुजबळ माध्यमांना आपल्याला दिल्लीतून उमेदवारी मिळाल्याचे सांगत सुटले आहेत. यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. आज सकाळीच शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते हे ठाण्याकडे निघाले होते, तर त्यानंतर मोर्चेबांधणी करण्यासाठी शिंदेंचे खासदार हेमंत गोडसे देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

आता या दोघांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटतात की श्रीकांत शिंदे यांनाच भेटून हात हलवत माघारी पाठविले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या जागेवरून शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोडसे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. 

अशातच बोरसे यांचे महत्वाचे वक्तव्य आलेले आहे. बाळासाहेबांचा आणि रामाचा धनुष्यबाण आहे, तो टिकलाच पाहिजे.  नाशिक लोकसभा मतदार संघ शिवसेनेला मानणारा आहे. आज होणाऱ्या भेटीत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही जागा शिवसेनेसाठी कशी महत्त्वाची आहे यासंदर्भात सांगणार आहोत. पुढील निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री यांचा असेल. उत्तर महाराष्ट्राचे शिवसेनेचे अस्तित्व या जागेवर अवलंबून आहे, असे बोरसे म्हणाले आहेत. 

ठाण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट झालीच पाहिजे. मंदिरात आल्यानंतर देवाचे दर्शन झाले पाहिजे, असे ते म्हणाले. हेमंत गोडसे किंवा छगन भुजबळ यांच्याबरोबर संबंध चांगले आहेत. महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. त्यामुळे कोणी असेल तरी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेHemant Godseहेमंत गोडसेShiv Senaशिवसेनाnashik-pcनाशिकmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४