शिवसेनेतील शंकर नम समर्थकांसह काँग्रेसमध्ये
By Admin | Updated: June 4, 2015 08:42 IST2015-06-04T04:41:09+5:302015-06-04T08:42:50+5:30
शिवसेना नेते व माजी मंत्री शंकर नम यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गांधी भवनस्थित प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश

शिवसेनेतील शंकर नम समर्थकांसह काँग्रेसमध्ये
मुंबई : शिवसेना नेते व माजी मंत्री शंकर नम यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गांधी भवनस्थित प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मंत्री रवीसेठ पाटील, माजी मंत्री राजेंद्र गावीत, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष मनिष गणोरे आदी उपस्थित होते.
शंकर नम १९८५ ते १९९८ दरम्यान आमदार होते. १९९१ ते १९९३ पर्यंत ते राज्यमंत्री व ठाणे जिल्ह्णाचे पालकमंत्री होते. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले होते. नम यांच्यासमवेत राजकुमार पाटील, कमलाकर गिंभळ, यतीन नम, गितेश पाचळकर, योगेश नम यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (विशेष प्रतिनिधी)