शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार

By admin | Updated: January 31, 2017 02:12 IST

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडल्यामुळे या निवडणुकीची सारी राजकीय

नाशिक : प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडल्यामुळे या निवडणुकीची सारी राजकीय गणितं बदलली आहेत. शिवसेनेची मतं आपल्या पारड्यात पडतील, असे काँग्रेसला वाटत आहे, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारातून अंग काढून घेतल्याने भाजपालाही हायसे वाटले आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या वळणावर पोहोचलेल्या या निवडणुकीने अखेरच्या क्षणी उत्कंठा वाढविली आहे. पारंपरिकपणे भाजपाच्या ताब्यात असलेल्या हा मतदारसंघ सहा वर्षांपूर्वी कॉँग्रेसने आपल्याकडे खेचून घेत डॉ. सुधीर तांबे यांच्या ताब्यात दिला असून, आत्ताही निवडणुकीच्या रिंगणात शिक्षक लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर कॉँग्रेसकडून तांबे हेच रिंगणात आहेत, तर भाजपाने गेल्या दोन निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. वरकरणी या दोन्ही पक्षांमध्येच ही लढत दिसत असली तरी अन्य राजकीय पक्षांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केल्यामुळे डॉ. तांबे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने उभी राहण्याची व्यक्त केलेली अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने आघाडी करण्यासाठी चालविलेली टाळटाळ. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अंग मोडून प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत. सध्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या निरोपाची ते वाट पहात आहेत. या दोन्ही बाबी डॉ. तांबे यांच्या अडचणी वाढविणाऱ्या व भाजपाला उत्साहित करणाऱ्या असल्या तरी, शिवसेनेने भाजपाबरोबर तोडलेल्या युतीमुळे कॉँग्रेसला हायसे वाटणे स्वाभाविक आहे. सेना-भाजपात सध्या असलेले वैर पाहता, भाजपाच्या पराभवासाठी सैनिक त्वेषाने पेटून उठतील अशीच रणनिती कॉँग्रेसने आखली आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका जशी भाजपासाठी महत्त्वाची आहे, तशीच ती कॉँग्रेससाठी देखील आहे. निवडणूक शिक्षकांसाठी, चर्चा राजकारणाचीया निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून, दोन्ही पक्षांनी मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे दावे करून स्वत:ची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविला असला तरी, निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्या आघाडीचे कॉ. प्रकाश देसले यांनीदेखील कॉँग्रेस व भाजपापुढे पर्याय उभा केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत एरव्ही राजकीय मुद्द्याला फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही, यंदा मात्र राजकीय मुद्द्यावरच ही निवडणूक लढविली जात आहे. पदवीधरांचे प्रश्न अनेक आहेत, त्याची चर्चा या प्रचारात झाली नाही, फक्त शिक्षक हाच एकमेव पदवीधर असल्याच्या समजातून फक्त शैक्षणिक संस्थांवरच साऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.त्यामुळे कोणत्या संस्थावर कोणाचे वर्चस्व आहे त्यावरच निवडणुकीचे गणितं मांडले जात आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातूनच भविष्यातील शिक्षक मतदारसंघाचेही भवितव्य अजमाविले जाणार असल्याने राजकीय पक्षांनी त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहण्यास सुरुवात केली आहे.