नागपुरात शिवसेनेचा राडा!

By Admin | Updated: February 14, 2015 04:00 IST2015-02-14T04:00:52+5:302015-02-14T04:00:52+5:30

‘व्हॅलेन्टाइन्स डे’ला विरोध दर्शवत शिवसैनिकांनी उपराजधानीत अनेक ठिकाणी गुंडगिरी करीत तरुण-तरुणींना शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला़

Shiv Sena's Rada in Nagpur! | नागपुरात शिवसेनेचा राडा!

नागपुरात शिवसेनेचा राडा!

नागपूर : ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ला विरोध दर्शवत शिवसैनिकांनी उपराजधानीत अनेक ठिकाणी गुंडगिरी करीत तरुण-तरुणींना शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला़
संस्कृती रक्षणाच्या नावाखाली शिवसैनिकांनी सायंकाळी फुटाळा, बॉटनिकल गार्डन, अंबाझरी उद्यान तसेच रस्त्यांवर अक्षरश: धिंगाणा घालत काही तरुणींचा विनयभंग केला, शिवीगाळ केली, स्कार्फ ओढला अन् तरुणांनाही मारहाण केली.
या घटनेमुळे तरुणाईमध्ये प्रचंड संतापाची भावना असून,सर्वत्र गुंडगिरीचा निषेध होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.
‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी ६० हून अधिक शिवसैनिक फुटाळा परिसरात एकत्र आले.
‘बॉटनिकल गार्डन’मध्ये शिरले अन् तेथे असलेल्या युगुलांमध्ये पळापळ सुरू झाली. त्यांनी काही जणांना घेरले अन् मुला-मुलींना चेहऱ्यावरून ‘स्कार्फ’ बाजूला करण्याचे फर्मान सोडले. एका तरुणीचा ‘स्कार्फ’ काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यानंतर त्यांचे छायाचित्रदेखील काढण्यात आले. काही युगुलांना उठाबशा काढायला लावल्या.
अंबाझरी उद्यानात कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे गोंधळ घालत सहज बोलत बसलेल्या काहीजणांना
कान पकडायला लावले. मिळेल ते जोडपं किंवा अगदी मुलगी एकटी असेल तरी त्यांना घेरून व अक्षरश: त्यांना अडवून या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ करण्यात आली. याप्रकाणी नागपूरक रांनी सुद्धा निषेध व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena's Rada in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.