शिवसेनेचा मनसेला दे धक्का!

By Admin | Updated: June 1, 2014 01:19 IST2014-06-01T01:19:19+5:302014-06-01T01:19:19+5:30

परिवहन निवडणुकांतील वादाचा वचपा काढण्यात सत्ताधारी शिवसेनेला यश आले असतानाच कार्यालयाचा ताबा घेण्यावरून मनसे आणि आघाडीत जुंपल्याचे दिसून आले .

Shiv Sena's MNSLA push! | शिवसेनेचा मनसेला दे धक्का!

शिवसेनेचा मनसेला दे धक्का!

>कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शनिवारी पार पडलेल्या अंदाजपत्रकाच्या महासभेत महापौर कल्याणी पाटील यांनी विरोधी पक्ष नेतेपदी आघाडीचे सदस्य विश्वनाथ राणो यांच्या नावाची घोषणा करून मनसेकडील पद हिरावून घेतले. लोकसभा आणि परिवहन निवडणुकांतील वादाचा वचपा काढण्यात सत्ताधारी शिवसेनेला यश आले असतानाच कार्यालयाचा ताबा घेण्यावरून मनसे आणि आघाडीत जुंपल्याचे दिसून आले . 
केडीएमसीत कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने सुरुवातीला शिवसेनेने मनसेशी छुपी युती करून महापौर पद पटकावले होते, तर विरोधी पक्ष नेतेपद मनसेला बहाल केले होते. दरम्यान, महासभेत काँग्रेसचे गटनेते सचिन पोटे यांनी विरोधी पक्ष नेतेपदी काँग्रेसचे सदस्य विश्वनाथ राणो यांचे नाव जाहीर करण्यात यावे, अशी मागणी केली होती. कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे महापौर पाटील यांनी स्पष्ट केले होते. 19(अ)प्रमाणो विरोधी पक्ष नेतापद जाहीर करण्याचे अधिकार महापौरांना असल्याने शनिवारच्या महासभेत निर्णय होण्याची शक्यता होती. आघाडीचे सदस्य राणो यांचे नाव जाहीर केले. त्यांचे नाव घोषित होताच मनसेच्या सदस्यांनी जोरदार हरकत घेतली. कोणत्या नियमांच्या आधारे हा निर्णय घेतला याचा खुलासा सचिव सुभाष भुजबळ यांनी करावा, असा सवाल विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला़ आघाडीला पद देण्याची कृती बेकायदेशीर असल्याचा आरोप करून मनसेने निषेध केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्वतंत्र गटनेते आहेत मग आघाडी कशी, कसा सवालही त्यांनी केला. मनसेचे म्हणणो फेटाळल्याने त्यांनी सभात्याग केला. 
 
च्दरम्यान, मंदार हळबे हे विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून राज ठाकरे यांच्या सभेला मार्गस्थ झाल्यानंतर कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या आघाडीच्या सदस्यांना टाळे दिसताच ते आक्रमक झाले. यावर काँग्रेसचे सदस्य सचिन पोटे, नवीन सिंग यांनी टाळा तोडण्याची भूमिका घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
 
च्या वेळी सचिव भुजबळ यांनाही चांगलेच फैलावर घेण्यात आले. आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्याकडे हे प्रकरण जाताच त्यांनी टाळे उघडण्याचे आदेश दिल़े परंतु हळबे यांनी त्यांच्या कर्मचा:यांमार्फत त्या कुलुपाची चावी पाठविल्याने वाद तूर्तास शमल्याचे दिसून आले. 

Web Title: Shiv Sena's MNSLA push!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.