शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका - राधाकृष्ण विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 22:52 IST

शिवसेनेची नाणारबाबत दुटप्पी भूमिका आहे. पण जनता यात फसणार नाही. काँग्रेस नेहमीच स्थानिकांच्या बाजूने राहिली आहे आणि यापुढेही राहील. जनतेला प्रकल्प नको असेल तर काँग्रेसलाही नको, असे मत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी : शिवसेनेची नाणारबाबत दुटप्पी भूमिका आहे. पण जनता यात फसणार नाही. काँग्रेस नेहमीच स्थानिकांच्या बाजूने राहिली आहे आणि यापुढेही राहील. जनतेला प्रकल्प नको असेल तर काँग्रेसलाही नको, असे मत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

काँग्रेसच्या कोकण जनसंपर्क यात्रेचा शेवटचा टप्पा सावंतवाडीतून सुरू झाला असून, त्या निमित्ताने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील  हे सोमवारी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार नसीम खान, काँग्रेस कोकण प्रभारी बी. संदीप, भाई जगताप, माजी आमदार सुभाष चव्हाण, राजन भोसले, विजय सावंत, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते विखे-पाटील म्हणाले, नाणार प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध आहे. हे आम्ही वेळोवेळी सांगितले आहे. सभागृहातही आमची हिच भूमिका राहिली आहे. पण शिवसेनेने यावर राजकारण केले. त्यांची बाहेर एक भूमिका असते आणि आत दुसरी भूमिका असते. शिवसेना नेहमी दुहेरी भूमिकेत असते, असा आरोप यावेळी विखे- पाटील यांनी केला. नाणार प्रकल्पग्रस्तांना घेऊन आम्ही दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेसची भूमिका ही विरोधांची अधिकृत आहे, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. मात्र सरकार नवनवीन प्रकल्पांची घोषणा करत आहे. जनता या सरकारच्या घोषणाबाजीला फसणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आमदार नितेश राणे हे जर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन काँग्रेसवरच टीका करत असतील आणि ते स्वाभिमानच्या व्यासपीठावर उपस्थित राहत असतील, तर आम्ही ही बाब प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या निर्दशनास आणू देऊ, असेही विखे-पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील