बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाखाली महापौर निवास बळकावण्याचा शिवसेनेचा डाव - राज ठाकरे

By Admin | Updated: November 17, 2015 18:16 IST2015-11-17T18:16:45+5:302015-11-17T18:16:45+5:30

मुंबईत अनेकांना भूखंड दिले जातात त्यासाठी जागा मिळते आणि बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा का मिळत नाही असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला

Shiv Sena's attempt to take over Mayor residence in the name of Balasaheb's memorial - Raj Thackeray | बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाखाली महापौर निवास बळकावण्याचा शिवसेनेचा डाव - राज ठाकरे

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाखाली महापौर निवास बळकावण्याचा शिवसेनेचा डाव - राज ठाकरे

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक करण्यास राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. मुंबईत अनेकांना भूखंड दिले जातात त्यासाठी जागा मिळते आणि बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा का मिळत नाही असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. वास्तविक ही त्यांची पळवाट आहे, महापौर बंगल्यावर शिवसेनेचा डोळा आहे, त्यासाठी स्मारक ही पळवाट असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे. यामागे या लोकांचे वेगळे स्वार्थ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा अनेक ठिकाणी आहेत असं सांगत महापौर निवास ही जागा महापौरांसाठीच राहिली पाहिजे असं सांगताना उद्या राष्ट्रपती भवन स्मारकासाठी घेतील असा टोलाही त्यांनी लगावला. बाळासाहेबांच्या नावाखाली शिवसेनेचा जागा बळकावण्याचा डाव असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
शहरात अनेक मोकळ्या जागा असताना, तुम्हाला महापौर बंगलाच कशाला हवा असं विचारत याच परीसरात रिकामी असलेली दादर म्युनिसिपल क्लबची जागा राज ठाकरे यांनी सुचवली आहे. हा रिकामा असलेला प्लॉट का नकोयत, महापौर बंगलाच का हवाय याचं उत्तर त्यांनी द्यावं असं सांगत आपण राज ठाकरे यांना भेटणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.

Web Title: Shiv Sena's attempt to take over Mayor residence in the name of Balasaheb's memorial - Raj Thackeray