शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न : राष्ट्रवादीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 20:39 IST

आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. त्यासाठी आजपर्यंत शिवसेनेचे कधी धाडस झाले नाही. पण प्रशांत किशोर यांच्या कन्सल्टन्सीचा हा परिणाम आहे.

पुणे : आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. त्यासाठी आजपर्यंत शिवसेनेचे कधी धाडस झाले नाही. पण प्रशांत किशोर यांच्या कन्सल्टन्सीचा हा परिणाम आहे. कन्सल्टन्ट लावून राजकारण करण्याची ही नवी पध्दत महाराष्ट्रात आली आहे. कन्सल्टन्ट सांगेल तसा दौरा करायचा, कार्यक्रमांचे आयोजन करायचे, अशी टाकी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी भाजपा व शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले, भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देवेंद्र फडणवीस असतील, अशी आशा आहे. आणि शिवसेनेचा चेहरा ठाकरे आहेत. पण एका युतीचे दोन चेहरे प्रोजेक्ट झाले आहेत. लोकसभेला २२० मतदारसंघात युती पुढे आहे. असे असताना एकच चेहरा पुढे करायला हवा. याचा अर्थ शिवसेनेला भाजपाचे नेतृत्व मान्य नाही. त्यांचे त्यावर एकमत झालेले नाही. महाराष्ट्रात अजून दोन मुख्यमंत्री पदे निर्माण झाली नाहीत, असा टोला पाटील यांनी लगावला. एकमेकांच्या विरोधात भांडायचे आणि महाराष्ट्रात आम्ही दोघेच आहोत असे चित्र निर्माण करण्याचा भाजपा व शिवसेनेचा प्रयत्न आहे, असे पाटील म्हणाले.काँग्रेस-राष्ट्रवादीतून माणसे यावीत यासाठी भाजपा प्रयत्न का करतय. याचा अर्थ त्यांना स्वत:वर आत्मविश्वास नाही. आता आम्हाला चिंता भाजपातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे. त्यांच्यावर रोडरोलर फिरायला लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता असल्याने भाजपा व शिवसेनेतील लोक आम्हाला येऊन भेटत आहेत. लोकांसमोर जाताना चेहरा वाचविण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चाचे नाटक केले जात आहे. पीक विम्यामध्ये काय भेटते हे माहित नसलेल्या मुंबईतील शिवसैनिकांना घेऊन मोर्चा काढला. आम्हीही आता या मुलभुत मुद्यांवर रस्त्यावर उतरणार आहोत. पुण्यातील घोटाळेबाज आमदार कोण?पुण्यातील सत्ताधारी पक्षाच्या दोन आमदारांनी करोडो रुपयांचा घोटाळा केल्याची चर्चा आहे. याबाबत पाटील यांना हटकले असता त्यांनीही याबाबत माहिती, कागदपत्रे मिळणार असल्याचे सांगितले. कागदपत्रांचा अभ्यास करून याबाबत लवकर माहिती देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील ते दोन घोटाळेबाज आमदार कोण, याबाबत चर्चेला ऊत आला आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस