शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

पैशांसाठी कोकणाला भस्मसात करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 16:03 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते.

मुंबईः महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. ते म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाला माझा विरोध आहे. या प्रकल्पाद्वारे कोकणाला भस्मसात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतक-यांना धमकावून जमिनी हिसकावल्या जातायत, वालम यांना मातोश्रीवर बोलावून धमकावलं गेलं आहे. शिवसेनेनं कोकणाच्या बाबतीत नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे.रत्नागिरीतल्या नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला राणेंनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेनं घातला आहे. 18 गावांतील जनतेचा, शेतकऱ्यांचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध असल्याचे राणे म्हणाले. कोकणात एकूण 13 हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहेत. या भागात 7 लाख आंब्यांची झाडं आणि 2 लाख काजूची झाडं आहेत, जगातला प्रसिद्ध देवगड आंबाही याच क्षेत्रातला आहे, असेही राणेंनी स्पष्ट केलं आहे.सांडपाण्यामुळे मासेमारीचं मोठं नुकसान होण्याची भीतीही राणेंनी वर्तवली आहे. राज्याचे 'उद्योगी'मंत्री आणि केंद्रात अवजड उद्योगमंत्री शिवसेनेचेच आहेत. उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला?, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.  सात पिढ्या बसून खाईल इतके पैसे मिळतील, असं पत्र वालम यांना देण्यात आलं. त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या, छळ केला. वालम यांना ‘मातोश्री’वर बोलवून दम दिला जातो आहे, असे गंभीर आरोप नारायण राणेंनी केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेना