शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शिवसैनिक वारकरी भाविकांच्या कायम पाठीशी- नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 17:28 IST

शिवसेनेकडून जखमी वारकऱ्यांना मदत

पुणे - पंढरपूरवरुन आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकर्‍यांच्या दिंडीत पुणे जिल्ह्यातील दिवे घाटात एक जेसीबी घुसून २ वारकरी मृत्युमुखी पडले. तर दोनजण गंभीर जखमी, 22 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेतील मृत आणि जखमींच्या नातेवाईकांच्या पाठिशी शिवसैनिक कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जखमी वारकर्‍यांच्या खात्यावर थेट दोन लाख चाळीस हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जखमींना धनादेश दिला जाईल-दिला जाईल असे म्हणत न बसता शिवसेना तात्काळ मदत करते, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्यांना घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका शिवसेनेच्या वतीने देण्यात यावी. तसेच हडपसर भागात हॉस्पिटलची संख्या जास्त आहे. येथे बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईक यांना राहण्याची हेळसांड होत असते त्यामुळे शिवसेनेच्या वतीने याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून जागा उपलब्ध केली जाईल आणि त्याठिकाणी रुग्णसेवालय उभारण्याची इच्छा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली असता नगरसेवक श्री. नाना भानगिरे यांनी याबाबत लवकरात लवकर कारवाई केली जाईल सांगितले. तसेच जखमी वारकरी रुग्णांची तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी नोबेल हॉस्पिटलचे कौतुक केले.मागील आठवड्यात पंढरपूरवरुन आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकर्‍यांच्या दिंडीत, पुणे जिल्ह्यातील दिवे घाटात एक जेसीबी घुसून 2 वारकरी मृत्युमुखी पडले. तर 24 जण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हडपसर येथील नोबल रूग्णालयात जाऊन, जखमी वारकरी भाविकांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी नोबल हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे मुख्य डॉ. खान, संचालक डॉ. पोटे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिग्विजय कांबळे, डॉ. गिरीष भोसले. तालुका हवेली तहसीलदार श्री. सुनील कोळी, नगरसेवक नाना भानगिरे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेविका प्राची आल्हाट, विजय देशमुख, तानाजी लोणकर, समीर तुपे, शिवसेना महिला शहर संघटक तथा नगरसेविका संगिता ठोसर, प्राची आल्हाट, युवासेना शादाब मुलानी, युवराज शिंगाडे, शिवसेना पदाधिकारी व वारकरी यावेळी अन्य उपस्थित होते.उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मागील कित्येक वर्षापासुन वारकरी भाविकांनी राज्याला एक दिशा देण्याचे काम केले आहे. हे वारकरी भाविक आळंदी ते पंढरपूर दरम्यान वारीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या वारीमध्ये आजवर केव्हा गालबोट लागण्याचे काम झाले नाही. मात्र यंदा पंढरपूर वरुन आळंदीच्या दिशेने दिंडी जाताना, एक जेसीबी घुसून निष्पाप वारकरी भाविकांना चिरडले जाते. ही घटना दुःखद घडली असून आता यापुढील काळात अशी घटना घडता कामा नये. त्या दृष्टीने लवकरच अधिकारी वर्गाची बैठक लावून, वारी आणि वर्षभरातील पंढरपूर, आळंदी येथे येणार्‍या दिंडीमध्ये पोलीस संरक्षण देण्याच निर्णय घेतला जाईल डॉ.गोऱ्हे असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेvarkariवारकरी