शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेत ‘स्ट्राइक रेट’ वाढेल? काँग्रेसची ‘व्होट बँक’ मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:37 IST

उद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अँजिओग्राफी झाली, त्यामुळे तब्येतीला काही मर्यादा आल्या तरी त्याची चिंता न करता ते ठाकरी शैलीत विरोधकांचा प्रचारात निश्चितच समाचार घेतील. 

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उद्धवसेनेने सर्वाधिक २१ जागा लढविल्या आणि ९ जागा जिंकल्या. मात्र, विधानसभेला यशाचा स्ट्राइक रेट वाढविण्याचे आव्हान या पक्षासमोर असेल. कारण, जितके जास्त यश तितके उद्धव ठाकरे हे मविआ सत्तेत आल्यास मुख्यमंत्रिपदाच्या समीप असतील.

२०१४ ते २०१९ या काळात भाजपसोबत शिवसेना सत्तेत होती. २०१९ मध्ये दोघांची फारकत झाली. भाजपला पर्याय देण्यासाठी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचा शिवसेना हा घटक पक्ष बनला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री झाले. सत्तापदे न घेण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासाठी घालून दिलेला पायंडा ‘महाराष्ट्राची, मराठी माणसांची गरज’ असे म्हणत मोडला गेला. आता सत्तेच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुरते मुरब्बी झाले आहेत. 

शिवसेनेचे ‘ठाणेदार’ अशी ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड केले आणि शिवसेनेत उभी फूट पडली. खरी शिवसेना कोणाकडे यावर अनेक तर्क दिले गेले. पक्षाचे चिन्ह आणि नाव हे शिंदे यांना मिळाले. लोकसभा निवडणुकीत शिंदेंपेक्षा ठाकरेंना दोन जागा जास्तच मिळाल्या. त्यामुळे शिवसेना दोघांमध्ये जवळपास समसमान विभागली गेली असल्याचे चित्र समोर आले. मात्र विधानसभेवर झेंडा फडकविण्यात उद्धव हे मविआच्या साथीने यशस्वी होतात की शिंदे हे महायुतीच्या साथीने यशस्वी होतात यावर शिवसेनेवर अधिपत्य कोणाचे हे ठरेल. 

काँग्रेसची ‘व्होट बँक’ मदतीलाउद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अँजिओग्राफी झाली, त्यामुळे तब्येतीला काही मर्यादा आल्या तरी त्याची चिंता न करता ते ठाकरी शैलीत विरोधकांचा प्रचारात निश्चितच समाचार घेतील. 

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीन पक्षांची मते एकमेकांना मोठ्या प्रमाणात मिळाली, त्यामुळे तिघांनाही फायदा झाला. 

खरे तर काँग्रेस आणि शरद पवार गटाची व्होटबँक वेगळ्या विचारांची होती, तरीही त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. विधानसभा निवडणुकीत असेच चित्र कायम राहिले तर उद्धव यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024