शिवसेना मजबूत असल्याचे दाखवून द्या. कोण गेले याचा विचार न करता मुंबईत पक्ष काम करतोय, त्याप्रमाणे राज्यभरातही कामे करा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, लढाईसाठी तयार राहा, शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे सूत्र कायम लक्षात ठेवा. पक्षाचे संघटन तळागाळात आणि गावागावात अधिक मजबूत करा.
नगरपालिका निवडणुकांसाठी आघाडी करण्याचे निर्णय हे स्थानिक पातळीवर घ्या. बुथप्रमुखांच्या तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या नियुक्त्या कराव्यात, असे आदेशही ठाकरे यांनी दिले.