शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

तर शिवसेना शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र उभारेल, उद्धव ठाकरेंनी घेतली लोकमतच्या बातमीची दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 12:22 IST

जर राज्य सरकार आणि जिव्हीके छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारत नसेल तर शिवसेना आणि शिवप्रेमी जनता येथे स्वतः येथे रायगडची प्रतिकृती असलेली छत्री उभारेल.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : जर राज्य सरकार आणि जिव्हीके छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारत नसेल तर शिवसेना आणि शिवप्रेमी जनता येथे स्वतः येथे रायगडची प्रतिकृती असलेली छत्री उभारेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उन्हात उभा आहे हे शिवसेना कदापी सहन करणार नाही, असा ठोस इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. सकाळी विलेपार्ले(पूर्व)पश्चिम दुर्तगती महामार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागी शिवसेना विभाग क्रमांक 4 आणि 5 आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी देखिल लोकमतची या संदर्भात आलेली बातमी वाचल्याचे सकाळी कॉल करून सांगितले होते.

यासंदर्भात लोकमतने सविस्तर वृत्त दिले होते, याशिवाय लोकमतची ऑनलाईन बातमी व्हायरल झाली होती. लोकमतच्या सततच्या पाठपुराव्यामुळे विधानसभेत अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.आजच्या लोकमतच्या सविस्तर वृतामुळे आणि कालच्या लोकमतच्या ऑनलाईन बातमीमुळेच उद्धव ठाकरे यांना सदर घोषणा करावी लागली अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे ग्रॉडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी दिली.

यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर,राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत,शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार डॉ.अनिल परब,उपमहापौर हेमांगी वरळीकर,स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर आणि शिवसैनिक व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.काय होतं लोकमतचं दि. 3 मार्चचं वृत्त, वाचा -

शिवसेना विभाग क्र ४ व ५ च्या वतीने उद्या रविवार दि ४ मार्च रोजी सकाळी  ९:३० वाजता शिवजयंती सोहळा विलेपार्ले (पूर्व)पश्चिम द्रुतगतीमार्ग  सहार विमानतळाच्या जवळ आयोजित करण्यात आला आहे.प्रति वर्षाप्रमाणे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सकाळी ९:४५ मिनिटे या वेळी उपस्थित राहणार आहेत.तर मुंबईसह राज्यात शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. विलेपार्ले (पूर्व ) पश्चिम दुर्तगती महामार्ग आणि अंधेरी(पूर्व) सहार वेअरहाऊस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 12 महिने ऊन व पाऊस झेलत आहे.

 मात्र त्याच्या डोक्यावर साधी संरक्षणासाठी छत्री देखिल नाही.लोकमतने सातत्याने हा विषय मांडला आहे.मात्र पूर्वीचा आणि आताच्या राज्य सरकारला याचा विसर पडला आहे.मात्र अजून येथे ना छत्री उभारली गेली ना म्युझियम अशी खंत वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.ग्राडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी व्यक्त केली.येथे पुतळ्याच्या तळघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे म्युझियम उभारण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती याची आठवण त्यांनी करून दिली.

 अरबी सुमुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच केली होतो,तर या स्मारकाचे टेंडर एल अँड टी कंपनीला नुकतेच देण्यात आल्याची घोषणा राज्यसरकारने केली आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत..छत्रपती शिवाजी महाराज अशी आपल्या भाषणाची सुरवात राजकीय पक्ष करतात,मग आपल्या आराध्य दैवताच्या सरंक्षणासाठी त्यांच्या डोक्यावर छत्री उभारून व येथे त्यांचे म्युझियम राज्य सरकार का करत नाही असा सवाल त्यांनी केला.

 अंधेरी (पूर्व) सहार वेअरहाऊस येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यानजिक आणि विलेपार्ले (पूर्व ) पश्चिम दुर्तगती महामार्गावर हनुमान रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात गेल्या 19 फेब्रुवारी शासकीय  शिवजयंती निमित्त सुशोभिकरण करण्याचा या दोन्ही पुतळ्याची देखभाल करणाऱ्या जिव्हीके कंपनीला विसर पडला तर शिवसेना भाजपाच्या आमदार व नगरसेवकांनी येथे पाठ फिरवली होती.मात्र दरम्यान गेल्या 19 फेब्रुवारी रोजी सहार गावातील 100 शिवप्रेमी व वॉचडॉग फाउंडेशन यांनी संयुक्तपणे सहार परिसरातील मार्केट, पाचपाखाडी मार्गे येथील वेअर हाऊस येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याया पुतळ्यापर्यंत बँडच्या निनादात शोभायात्रा काढली.छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा येथे ठेऊन शिवप्रतिमेला पुष्पहार घातला होता याची आठवण त्यांनी करून दिली.

1999 साली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीं आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सहार विमानतळासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसवण्याचा कामाचे भूमिपूजन केले होते.तर 2004 साली त्यांच्या हस्ते येथे पुतळा बसवण्यात आला होता.मात्र सहार 2012 मध्ये तो शिफ्ट करून सध्या वेअरहाऊस येथे बसवण्यात आला आहे.

त्यामुळे पुन्हा सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतर राष्ट्रीय विमानतळाची ओळख म्हणून जशी ऍडमिरल होराटीओ नेल्सन यांची आठवण म्हणून लंडन येथील ट्रफलगार स्केवर येथे असलेल्या  त्यांच्या ब्रॉंझच्या 169 फूट उंचीचा पुतळा बसवला आहे.त्याप्रमाणे सहार येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा समोरील 5 एकर जागेत 100 फूट उंच  असा शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी अँड. ग्राडफे पिमेंटा व निकोलस अल्मेडा यांनी  केली आहे. 

गेल्या पालिका निवडणुकीपूर्वी शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाने जोरदार शक्ति प्रदर्शन केले.तर शिवजयंतीच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेने जोरदार शक्ति प्रदर्शन केले होते.फक्त निवडणुकीपूर्वी येथे शिवजयंती राजकीय पक्ष येथे साजरी करतात का असा टोला त्यांनी लगावला.

 दरम्यान गेल्या 19 फेब्रुवारी रोजी सहार गावातील 100 शिवप्रेमी व वॉचडॉग फाउंडेशन यांनी संयुक्तपणे सहार परिसरातील मार्केट, पाचपाखाडी मार्गे येथील वेअर हाऊस येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याया पुतळ्यापर्यंत बँडच्या निनादात शोभायात्रा काढली.छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा येथे ठेऊन शिवप्रतिमेला पुष्पहार घातला होता याची आठवण त्यांनी करून दिली.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMumbaiमुंबई