शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना राज्यात शिवसंपर्क अभियान राबविणार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 05:28 IST

Shiv Sena : राज्यातील ९० पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ मध्ये होत असून त्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या शिवसेना पक्षनेतृत्वाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.      राज्यातील ९० पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ मध्ये होत असून त्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संघटनात्मक उभारणीसाठी शिवसेना राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविणार आहे. २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान राबविले जाईल.वर्षा निवासस्थानी मंगळवारी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. त्याला सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे मंत्री, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे सेक्रेटरी, तसेच शिवसेनेचे बहुतांश खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख असे १०० नेते, पदाधिकारी उपस्थित होते.अभियानाच्या कालावधीत राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यात सेनेचा एक आमदार आणि एक खासदार फिरणार आहे. बुथ बांधणी कितपत झाली आहे, याची ते खातरजमा करतील. अभियानामार्फत महाविकास आघाडी सरकारच्या विकास योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत बजावले आहे. २०२२ मध्ये राज्यातील बहुतांश पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली असल्याच्या चर्चा होत्या. मात्र पूजा चव्हाण प्रकरणी किंवा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासंदर्भात कोणताही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला नाही, असे सेना आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे