शिवसेना दादरमध्ये मनसेला देणार कडवं आव्हान
By Admin | Updated: January 16, 2017 10:51 IST2017-01-16T10:06:46+5:302017-01-16T10:51:42+5:30
मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिवसेनेकडून तगडं आव्हान देण्याची रणनीती मातोश्रीवर जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेना दादरमध्ये मनसेला देणार कडवं आव्हान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला दणका देण्याची पूर्ण तयारी शिनसेनेकडून केली जात आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिवसेनेकडून तगडं आव्हान देण्याची रणनीती मातोश्रीवर जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दादरमधील शिवसेनेच्या पहिल्या उमेदवाराला एकमताने मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दादरच्या वॉर्ड क्रमांक 191 मधून मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी मिळणार आहे, अशी चर्चा आहे.
स्वप्ना देशपांडे यांना 'काँटे की टक्कर' देण्यासाठी शिवसेनेकडून विशाखा राऊत यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनसेच्या उमेदवारासमोर तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी विशाख राऊत यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याची म्हटले जात आहे. शाखा राऊत या मुंबईच्या माजी महापौर आणि माजी आमदारही राहिल्या आहेत.
महापालिका निवडणुका एक महिन्यावर राहिल्या असून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.