शहरं
Join us  
Trending Stories
1
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
4
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
5
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
6
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
7
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
9
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
10
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
11
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
12
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
13
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
14
अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग नाही, हा आमचा झांगनान; चीनची दर्पोक्ती, भारतावर निशाणा
15
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
16
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
17
१८८९ ते १९४९ - राज्यघटनेच्या जन्माची ६० वर्षे! 'असा' भारतीय घटनेच्या निर्मितीचा इतिहास
18
‘काँग्रेस’चे शशी थरूर भाजपमध्ये (कधी) जातील?; केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील
19
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
20
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना २०१९ मध्ये स्वबळावर लढणार , उद्धव ठाकरेंची घोषणा; यापुढे भाजपाशी युती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 04:12 IST

राज्य आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडण्याचा सातत्याने इशारा देणा-या शिवसेनेने तूर्त सत्तेत राहण्यास पसंती दिली आहे. मात्र, २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडण्याचा सातत्याने इशारा देणा-या शिवसेनेने तूर्त सत्तेत राहण्यास पसंती दिली आहे. मात्र, २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्याबैठकीत करण्यात आला. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली, तर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना नेतेपदी बढती देण्यात आली.एनएससीआयच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत स्वबळावर लढण्याचा ठराव शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी मांडला. खा.अनिल देसाई यांनी त्यास अनुमोदन दिले. आम्ही स्वबळावर लढून महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी २५ तर विधानसभेच्या २८८ पैकी १५० जागा जिंकू आणि राज्यात स्वबळावर सत्ता मिळवू, असा निर्धार या ठरावाद्वारे करण्यात आला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपाशी युती केली होती. आम्ही इतकी वर्षे संयम बाळगून त्यांच्यासोबत राहिलो, पण आज हाच पक्ष शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करीत असून, त्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत असल्याची टीका ठरावात करण्यात आली. पक्षप्रमुख पदाची सूत्रे पुन्हा स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात उद्धव यांनी भाजपाचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका केली. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना भाऊ मानणाºया पीडीपीसोबत काश्मिरात सत्ता भोगणाºया भाजपाचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. स्वबळावर लढणे हा गुन्हा नाही. शिवसेनाप्रमुख हयात असताना प्रमोद महाजन यांनी शतप्रतिशत भाजपाची घोषणा केली होती. आता समोर मोदी असोत वा आणखी कोणी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणारच, अशी गर्जना उद्धव यांनी केली.प्रत्येक राज्यात लढणार-शिवसेना यापुढे प्रत्येक राज्यात निवडणूक लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. आतापर्यंत हिंदुत्ववादी मतांमध्ये विभाजन होऊ नये, म्हणून आम्ही लढत नव्हतो, पण आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्हालाच लढावे लागेल, असे ते म्हणाले.पक्ष म्हणून त्यांना अधिकार-शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही बोललेच पाहिजे असे नाही. त्यांनी त्यांची भूमिका आज मांडली. आम्ही भविष्यात लोकसभा, विधानसभेचा विचार करू, तेव्हा काय ती भूमिका मांडू. पक्ष म्हणून भूमिका घेण्याचा त्यांना अधिकार आहे. - खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपानिवडणुकीला आणखी अवधी आहे. सध्या तरी आमची युती आहे. आमचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार