शिवसेना सराफांसाठी आंदोलन करणार - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: March 30, 2016 14:19 IST2016-03-30T14:19:11+5:302016-03-30T14:19:11+5:30

शिवसेना सराफांसाठी आंदोलन करणार असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे

Shiv Sena will do agitation for silver - Uddhav Thackeray | शिवसेना सराफांसाठी आंदोलन करणार - उद्धव ठाकरे

शिवसेना सराफांसाठी आंदोलन करणार - उद्धव ठाकरे

>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ३० - शिवसेना सराफांसाठी आंदोलन करणार असल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. सोन्याच्या दागिने उत्पादनावर लावलेल्या एक टक्के अबकारी कराच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांचा गेले २८ दिवस देशव्यापी संप सुरू आहे. 'सरकार परदेशी कंपन्यांशी चर्चा करत मग ज्वेलर्सशी चर्चा का करत नाही ?', असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. यावेळी बोलताना त्यांनी देवनारप्रश्नी सरकार आणि महानगरपालिकेने एकत्र तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे. तसंच पठाणकोट येथे पाकिस्तानच्या अधिका-यांना रेड कार्पेट टाकल्यावरुन केंद्र सरकारवरदेखील टीका केली आहे.

Web Title: Shiv Sena will do agitation for silver - Uddhav Thackeray