शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

शिवसेनेला इशारा तर काँग्रेसला गाजर

By admin | Updated: March 21, 2015 01:46 IST

विधान परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार रिंगणात ठेवला आणि काँग्रेसची मते घेतली तर सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी ठेवा,

मुंबई : विधान परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार रिंगणात ठेवला आणि काँग्रेसची मते घेतली तर सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी ठेवा, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने शिवसेनेने नमते घेतले, अशी चर्चा आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसला विधान परिषदेतील उपसभापतिपदाचे गाजर दाखवले असल्याने काँग्रेसने माघार घेतल्याचे बोलले जाते.शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांना पहिल्या महिला सभापती म्हणून काँग्रेसच्या मदतीने पदावर बसवायचे, अशी तयारी शिवसेनेने केली होती. भाजपा सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामराजे निंबाळकर यांना मते देणार नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी त्यांची अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली, तेव्हा स्पष्ट केले होते. भाजपाबरोबर असलेल्या चार अपक्षांनी तरी तटस्थ राहू नये, याकरिता पवार हे फडणवीस यांना विनंती करीत होते. मात्र दिल्लीतून अमित शहा यांच्याकडून जो निरोप येईल त्यानुसार मतदान होईल. भाजपा तटस्थ व भाजपासोबतचे अपक्ष राष्ट्रवादीसोबत हे होणार नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिले होते.गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडील ऊर्जा खात्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राधाकृष्ण विखे हे सभापतिपदाची निवडणूक लढवावी याच मताचे होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधान परिषदेतील गटनेते माणिकराव ठाकरे हेही त्याच मताचे होते. यातूनच डॉ. गोऱ्हे यांना पहिल्या महिला सभापती करण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून शिवसेनेकडे धाडला गेला. याबाबत शिवसेनेच्या रामदास कदम व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची चर्चा झाली होती. शिवसेना व काँग्रेसची ही योजना हाणून पाडण्याचे भाजपा व राष्ट्रवादीने ठरवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना गुरुवारी रात्री चर्चेला बोलावले. काँग्रेसचा पाठिंबा घेऊन शुक्रवारी निवडणूक लढवली तर शिवसेनेने सत्ता सोडण्याची तयारी ठेवावी, अशा स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी इशारा दिला. अगोदरच एलईडी लाइटपासून भूसंपादन विधेयकापर्यंत अनेक विषयांवर शिवसेना सातत्याने घेत असलेल्या भूमिकेमुळे आमच्या पक्षात अस्वस्थतता आहे. त्यामुळे उमेदवार मागे घेतला नाही तर आम्हाला नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री बोलल्याचे समजते. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. सभापतिपदावरून शिवाजीराव देशमुख यांना हटवताना भाजपाने राष्ट्रवादीला मदत करून दिलेला संदेश चुकीचा होता. सरकारमध्ये आम्ही बरोबर असताना राष्ट्रवादीला मदत करणे योग्य नव्हते. वांद्र (पूर्व) येथील विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करण्याची भाषा मुंबईतील भाजपाचे नेते करीत असल्याकडे ठाकरे यांनी फडणवीस यांचे लक्ष वेधले. वांद्रे पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेनेबरोबर राहील, असे मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना आश्वस्त केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ठाकरे यांना दूरध्वनी करून वांद्रे (पूर्व)ची पोटनिवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ नका आणि शरद रणपिसे यांचा अर्ज मागे घ्या, अशी विनंती केल्याचे कळते. विधानसभेतील उपाध्यक्षपद भाजपा शिवसेनेला देणार आहे. त्याच धर्तीवर विधान परिषदेत आमचा सभापती झाल्यास दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या काँग्रेसला उपसभापतिपद देऊ, अशी तयारी पवार यांनी चव्हाण यांच्याकडे दाखवली. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस उपसभापतिपद काँग्रेसला देण्यास विरोध करीत होता.़़़आणि नीलमतार्इंनी अर्ज घेतला माघारीविधान भवनात महसूलमंत्री एकनाथ खडसे, रामदास कदम व डॉ. नीलम गोऱ्हे यांची बैठक झाली. त्यामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आणि तटस्थ राहण्याचा निर्णय झाला. आता राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात लढत होईल, असे भाजपा-सेनेला वाटले. परंतु पवार यांनी चव्हाण यांना उपसभापतिपदाचे आश्वासन दिले असल्याने काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध असतानाही रणपिसे यांचा अर्ज मागे घेतला गेला. विधानसभेत भाजपाचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपाध्यक्ष तर विधान परिषदेत राष्ट्रवादीचा सभापती तर काँग्रेसचा उपसभापती होऊ शकेल. वांद्रे (पूर्व)मध्ये भाजपा-सेनेच्या उमेदवारामागे उभा राहील, अशी शक्यता आहे.