शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गृह खात्यासाठी शिवसेना आग्रही; अमित शाह-एकनाथ शिंदेंच्या बैठकीत होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:22 IST

महायुती सरकारचा शपथविधी आज होत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत शिंदेंची बैठक होणार आहे.

Eknath Shinde Amit Shah Meeting Latest News: महायुती सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असून, मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली. 

उपमुख्यमंत्री होण्यास शिंदे झाले तयार

भाजप सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रि‍पदावर दावा केला. त्यानंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्री होण्यास नकार दिला होता. त्यांची भूमिक शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत स्पष्ट नव्हती. शिवसेना आमदारांच्या मागणीनंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला. 

शपथ घेतल्यानंतर शाहांसोबत बैठक

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, "एकनाथ शिंदे शपथ घेण्यास जाणार आहेत. शपथविधी झाल्यानंतर अमित शाहांना ते भेटणार आहेत. त्या बैठकीत गृह खाते आणि इतर खात्यांचा निर्णय होईल."

एकनाथ शिंदेंचा गृह खात्यासाठी आग्रह आहे. उपमुख्यमंत्री आणि गृह खाते असे शिंदेंना हवे असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर गृह खात्याचा आग्रह धरण्यास सुरूवात केली होती. 

खातेवाटपाचा निर्णय होऊ न शकल्याने तीन जणांचाच शपथविधी होणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल, असे महायुतीतील नेत्यांकडून सांगितले जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस